Share Market: भांडवली बाजार तेजीत; सेन्सेक्स आणि निफ्टीत वाढ

सकाळ ऑनलाईन टीम
Monday, 12 October 2020

जागतिक बाजारापेठेत सकारात्मक ट्रेंड असताना, एचडीएफसी, इन्फोसिस आणि रिलायन्स इंडस्ट्रीजसारख्या मोठ्या कंपन्यांचे शेअर्स वाढताना दिसले.

नवी दिल्ली: जागतिक बाजारापेठेत सकारात्मक ट्रेंड असताना, एचडीएफसी, इन्फोसिस आणि रिलायन्स इंडस्ट्रीजसारख्या मोठ्या कंपन्यांचे शेअर्स सोमवारी सुरुवातीच्या व्यवहारात सुमारे 400 अंकांनी वधारताना दिसले.  

सत्राच्या सुरुवातीला बीएसईचा (BSE) शेअर्सचा सेन्सेक्स 396 अंकांनी वाढून 40,905.49 वर स्थिरावला. त्याचप्रमाणे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी (NIFTY) 107.85 अंकांनी म्हणजेच 0.91 टक्क्यांनी वाढून 12,022.05 वर स्थिरावला.

सेन्सेक्समध्ये स्टेट बँकेचे शेअर्स सर्वाधिक सुमारे तीन टक्क्यांनी वाढला आहे. आयटीसी, पॉवरग्रीड, अॅक्सिस बँक, एनटीपीसी, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी आणि कोटक बँकेचे शेअर्सही वाढताना दिसले आहेत. 

दुसरीकडे बजाज ऑटो, ओएनजीसी, टायटन, एचडीएफसी बँक आणि एशियन पेंट्सचे शेअर्स कमी होऊन तोट्यात जाताना दिसले. मागील सत्रात सेन्सेक्स 326.82 अंकांनी वाढून 40,509.49 अंकांवर बंद झाला. निफ्टी 79.60 अंकांनी वधारून 11,914 अंशांवर स्थिरावला.

अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प (DONALD TRUMP) यांच्या तब्येतीत सुधारणा होत असल्याने जागतिक बाजारपेठेला उभारी येताना दिसत आहे. जागतिक स्तरावर मध्यवर्ती बॅंकांनी सोने खरेदी बंद केल्याने सोन्याच्या दरातही अस्थिरता दिसत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NIFTY and SENSEX showing gradual increase