नीरव मोदीला ब्रिटन सरकारकडून 'गोल्डन व्हिसा' 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 15 मार्च 2019

लंडन: पंजाब नॅशनल बॅंक (पीएनबी) गैरव्यवहार प्रकरणातील फरार आरोपी अब्जाधीश हिरा व्यावसायिक नीरव मोदी लंडनमध्ये असल्याचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वीच व्हायरला झाला. ब्रिटन सरकारने नीरव मोदीला 'गोल्डन व्हिसा' दिला आहे. ब्रिटन सरकारकडून गुंतवणूकदारांना दिला जाणारा Tier-1 श्रेणीतील  व्हिसा देण्यात आला आहे. ब्रिटनमधील ‘दी डेली टेलिग्राफ’ या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, मोदी लंडनमध्ये 80 लाख पौंड किंमतीच्या (सुमारे 75 कोटी रुपये) आलिशान घरात राहत असून हिऱ्यांचा व्यापार करीत आहे. सेंटर पॉईंट टॉवरच्या थ्री बीएचके फ्लॅटमध्ये त्याचे वास्तव असल्याचा दावा केला जात आहे.

लंडन: पंजाब नॅशनल बॅंक (पीएनबी) गैरव्यवहार प्रकरणातील फरार आरोपी अब्जाधीश हिरा व्यावसायिक नीरव मोदी लंडनमध्ये असल्याचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वीच व्हायरला झाला. ब्रिटन सरकारने नीरव मोदीला 'गोल्डन व्हिसा' दिला आहे. ब्रिटन सरकारकडून गुंतवणूकदारांना दिला जाणारा Tier-1 श्रेणीतील  व्हिसा देण्यात आला आहे. ब्रिटनमधील ‘दी डेली टेलिग्राफ’ या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, मोदी लंडनमध्ये 80 लाख पौंड किंमतीच्या (सुमारे 75 कोटी रुपये) आलिशान घरात राहत असून हिऱ्यांचा व्यापार करीत आहे. सेंटर पॉईंट टॉवरच्या थ्री बीएचके फ्लॅटमध्ये त्याचे वास्तव असल्याचा दावा केला जात आहे. लंडनमध्ये रस्त्यावर फिरताना वेगळ्याच लुकमधील नीरवशी 'द टेलिग्राफ'च्या प्रतिनिधींनी बातचितही केली. 

 'गोल्डन व्हिसा' म्हणजे काय? 
ब्रिटन सरकारकडून युरोपियन युनियन बाहेरील गुंतवणूकदारांना हा 'गोल्डन व्हिसा' देण्यात येतो. शिवाय त्यानुसार गुंतवणूकदाराला तेथील सरकारी रोख्यांमध्ये किंवा तेथील कंपनीमध्ये 20 लाख पौंड म्हणजेच सुमारे 26.48 लाख अमेरिकी  डॉलरची गुंतवणूक करावी लागते. ब्रिटन सरकारने भारतीय पासपोर्टवर हा व्हिसा दिला आहे. या व्हिसामुळे व्यक्ती ब्रिटनमध्ये शिक्षण घेऊ शकतो.. नोकर करू शकतो तसेच स्वतःचा व्यवसाय देखील सुरु करू शकतो. रोख्यांमध्ये किंवा तेथील कंपनीमध्ये करण्यात आलेली गुंतवणूक पाच वर्षांपर्यंत काढता येत नाही. तसेच तोपर्यंत गुंतवणूकदार तेथील नागरिकत्व मिळविण्यास पात्र होतो. शिवाय, गुंतवणूकदाराने आणखी गुंतवणूक केल्यास त्यास लवकर नागरिकत्व प्राप्त करता येऊ शकते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nirav Modi Is Apparently Living In London On A Golden Visa