नीरव मोदीची ‘हिरा’फेरी

Nirav-Modi
Nirav-Modi

नवी दिल्ली - पंजाब नॅशनल बॅंकेला (पीएनबी) हजारो कोटी रुपयांचा गंडा घालून फरार झालेल्या नीरव मोदी या हिरे व्यावसायिकाचा गोलमाल व्यवहार समोर आला आहे. नीरवने तीन कॅरेटचा एकच पिवळ्या रंगाचा हिरा त्याच्याच मालकीच्या चार कंपन्यांना विकला, हाच व्यवहार ‘पीएनबी’तील गैरव्यवहाराचे मूळ असल्याचे स्पष्ट झाले आहे.

नीरवने २०११ मध्ये पाच आठवड्यांच्या अवधीत उपरोक्त व्यवहार केला होता, असे अमेरिकी बॅंकेतील दिवाळखोरी प्रक्रियेच्या निरीक्षकांनी सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे. या हिऱ्याच्या खरेदी विक्रीचा खोटा आर्थिक व्यवहार पुढे आणखी कर्जे मिळविण्यासाठी वापरण्यात आला, असे अमेरिकेच्या ‘सिक्‍योरिटी अँड एक्‍सचेंज कमिशन’ आणि न्याय विभागाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. नीरव मोदी आणि त्याच्या सहकाऱ्यांनी विविध व्यवहारांची बनावट बिले तयार करून परदेशातही चार अब्ज डॉलर कर्ज घेतले. नीरवने काही हिरे भारतात आणण्यासाठी त्याच्या मालकीच्या २० शेल कंपन्यांचा वापर केला.

अनधिकृत मार्गाचा अवलंब
नीरवच्या अमेरिकेतील कंपन्यांनी हिऱ्यांची निर्यात करताना अधिकृत आणि पारंपरिक मार्गाचा अवलंब केला नव्हता. या व्यवहारांमध्ये अधिकृत कुरिअर कंपन्यांऐवजी ‘फेडएक्‍स’चा वापर करण्यात आला. यात सतरा लाख डॉलर किंमतीच्या सतरा कॅरेटच्या हिऱ्याचाही समावेश होता. यात फेडएक्‍सने मात्र केवळ १.५ लाख डॉलरचाच विमा उतरविला होता. यामुळे ‘पीएनबी’चा नीरवच्या संपत्तीवरील हक्क आणखी मजबूत होणार आहे.

या कंपन्यांचा समावेश
ऑगस्ट २०११ मध्ये हाच पिवळा हिरा अमेरिकी कंपनी ‘फायरस्टार डायमंड’ला विकण्यात आला होता. पुन्हा तो हाँगकाँग येथील ‘फॅन्सी क्रिएशन’ नावाच्या शेल कंपनीकडे पाठविण्यात आला. येथे त्याची किंमत अकरा लाख रुपये एवढी असल्याचे सांगण्यात आले. दोन आठवड्यांनंतर हाच हिरा ‘सोलर एक्‍स्पोर्ट कंपनी’कडे पाठविण्यात आला. या व्यवहारांमध्ये सहभागी झालेल्या वीस कंपन्या या नीरवच्याच मालकीच्या होत्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com