मोदी सरकारला मोठे यश; कर्ज बुडविणाऱ्याची गोठविली खाती

मोदी सरकारला मोठे यश; कर्ज बुडविणाऱ्याची गोठविली खाती

नवी दिल्ली: पंजाब नॅशनल बॅंक (पीएनबी) गैरव्यवहारातील मुख्य आरोपी नीरव मोदी आणि त्याची बहीण पूर्वी मोदीची स्वित्झर्लंडमधील बँक खाती गोठविण्यात आली आहेत. भारतीय तपास यंत्रणांना नीरव मोदीची सुमारे  60 लाख अमेरिकी डॉलरची संपत्ती गोठविण्यात यश मिळाले आहे. पंजाब नॅशनल बँकेला 11 हजार 400 कोटींचा चुना लावून पळून गेलेला हिरे व्यापारी नीरव मोदी याला लंडनमध्ये अटक करण्यात आली आहे.

पीएनबी गैरव्यवहारात सरकारला दुसरे मोठे यश मिळाले आहे. भारताचा फरार आर्थिक गुन्हेगार मेहुल चोक्सीचे भारत सरकारकडे प्रत्यार्पण होण्याची शक्यता आहे. भारताकडून वाढत असलेल्या दबावाच्या पार्श्वभूमीवर अॅंटिग्वाचे पंतप्रधान गॅस्टोन ब्रॉऊनी यांनी मेहूल चोक्सीसंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर ही शक्यता बळावली आहे. मेहुल चोक्सीचे नागरिकत्व रद्द करून त्याला भारत सरकारच्या हवाली करता येऊ शकेल कारण त्याचे सर्व कायदेशीर मार्ग आता संपले आहेत, असे ब्रॉऊनी यांनी म्हटले आहे. 

भारतात गैरव्यवहार करुन नीरव मोदी दीड वर्षांपासून फरार झाला होता. नीरव मोदीविरोधात लंडनमधील वेस्ट मिनिस्टर न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले होते. हे अटक वॉरंट जारी केल्यानंतर दोन दिवसात नीरव मोदीला पोलिसांनी अटक केली होती. नीरव मोदीला झालेली अटक आणि आता स्वित्झर्लंडमधील बँक खाती गोठविण्यात आल्याने हे भारत सरकारचे मोठे यश असल्याचे मानले जात आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com