भारतात महागाई खूप जास्त नाही, निर्मला सीतारमन यांची अजब प्रतिक्रिया | Nirmala Sitharaman Comment On Inflation | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Nirmala Sitharaman

भारतात खूप काही महागाई नाही - निर्मला सीतारमन

महागाईमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त आहे. मात्र भारत सरकार आणि त्यांचे मंत्री महागाईवर लोकांना दिलासा मिळेल असे निर्णय घेताना दिसत नाही. दुसरीकडे किराणा सामनापासून गाडी भाडे यासह इतर वस्तूंची भाववाढ झाली आहे. जगायचं कसं हा प्रश्न पडला आहे. मात्र सामान्यांना दिलासा देण्याऐवजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी अजब प्रतिक्रिया महागाईवर (Inflation) दिली आहे. भारतात महागाईचा दर खूप जास्त नाही, अशी प्रतिक्रिया सीतारामन यांनी दिली आहे. त्या अमेरिकेतील वाॅशिग्टन डीसी येथील एका कार्यक्रमात बोलत होत्या. आमच्यासमोर आंतरराष्ट्रीय आव्हाने आहेत. (Nirmala Sitharaman Reaction On Inflation In India)

हेही वाचा: चीन लवकरच तैवानवर करु शकतो हल्ला !रशियावर बीजिंगचे लक्ष

त्यामुळे तेलाच्या किंमती असो किंवा वस्तुंच्या किंमती आकाशाला भिडत आहेत. त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होईल. मात्र या व्यतिरिक्त भारतात महागाई दर ६.९ टक्के आहे. आमचे लक्ष्य ४ टक्के आहे. यात २ टक्के अधिक किंवा कमी होण्याची शक्यता आहे. या प्रमाणे आम्ही ६ टक्क्यांपर्यंत जाऊ शकतो. आम्ही ६ टक्क्यांची पातळी पार केली आहे. मात्र आम्ही त्यापेक्षा फार पुढे गेलेलो नाहीत.

हेही वाचा: अति झाली महागाई, कुटुंबाचे गणितच कोलमडले !

राष्ट्रीय सांख्यकी कार्यालयाच्या (NSO) विदानुसार किरकोळ महागाई मार्चमध्ये ६.९५ टक्क्यांवर गेली होती. ती १७ महिन्यांमध्ये सर्वात जास्त किरकोळ महागाई होती. सीतारामन म्हणाल्या, वाढत्या किंमतीचा बोजा सामान्यांवर पडत आहे. जेव्हा कोरोनाचा फटका बसला तेव्हा पायाभूत सुविधा उभारणीसाठी खर्च करणे हे अर्थव्यवस्थेसाठी चांगला पर्याय ठरेल.

Web Title: Nirmala Sitharaman Reaction On Inflation In India

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..