निसान मोटार 'यामुळे' करणार साडेबारा हजार कर्मचाऱ्यांची कपात

वृत्तसंस्था
गुरुवार, 25 जुलै 2019

नवी दिल्ली: निसान मोटर ही जगप्रसिद्ध ऑटोमोबाईल कंपनी मोठ्या प्रमाणावर कामगार कपात करणार आहे. निसान 2022 पर्यत जागतिक पातळीवर 12,500 कर्मचाऱ्यांची कपात करणार आहेत. कंपनीच्या विक्रीत झालेली घट, वाढता उत्पादन खर्च यामुळे खर्चात कपात करण्यासाठी कंपनी हे पाऊल उचलणार आहे. आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी अटक झालेल्या निस्सान मोटर्सचे अध्यक्ष कार्लोस घोन यांच्या प्रकरणातून सावरण्याचाही निसानचा प्रयत्न सुरु आहे. 

निसानच्या नफ्यात चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत तब्बल 98.5 टक्के घट झाली आहे. निसानला फक्त 160 कोटी येनचा (1.48 कोटी डॉलरचा) नफा झाला आहे. निसान जपानची दुसऱ्या क्रमांकाची ऑटोमोबाईल कंपनी आहे. उत्तर अमेरिकेत कंपनीच्या व्यवसायावर मोठाच परिणाम झाला आहे. प्रतिस्पर्धी कंपन्यांना तोंड देताना वाहनांच्या किंमती आटोक्यात ठेवताना कंपनीला मोठ्या अडचणीला तोंड द्यावे लागते आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nissan to cut 12,500 jobs worldwide