
अल्पबचत योजनांमध्ये सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ), राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (एनएससी), किसान विकास पत्र (केव्हीपी), मुदत ठेवी (टीडी), मासिक प्राप्ती योजना (एमआयएस) यांचा समावेश होतो.
नवी दिल्ली - केंद्र सरकारने चालू आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीसाठी (जानेवारी ते मार्च २०२१) 'पीपीएफ', 'एनएससी'सह विविध अल्पबचत योजनांचे व्याजदर कायम ठेवले आहेत. सलग तिसऱ्या वेळी सरकारने व्याजदर कायम ठेवल्याने सर्वसामान्य गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला आहे.
चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीत अल्पबचत योजनांच्या व्याजदरात मोठी कपात करण्यात आली होती. त्यावेळी साधारणपणे ०.७० टक्के ते १.४० टक्के इतकी मोठी कपात केल्याने गुंतवणूकदारांना मोठी झळ बसलेली होती.
अल्पबचत योजनांमध्ये सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ), राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (एनएससी), किसान विकास पत्र (केव्हीपी), मुदत ठेवी (टीडी), मासिक प्राप्ती योजना (एमआयएस), पुरनावर्ती ठेव (आरडी), ज्येष्ठ नागरिक बचत योजना (एससीएसएस), सुकन्या समृद्धी योजना (एसएसवाय) आदी योजनांचा समावेश होतो. याशिवाय पोस्टात बचत खात्याची (एसबी) सोयदेखील असते व त्यावर सध्या वार्षिक ४ टक्के दराने व्याज दिले जाते.
हे वाचा - नववर्षात सोनं जाणार 60 हजाराच्या पार; सोन्याचा दर 63 हजारांवर जाण्याची शक्यता
अल्पबचत योजनांचे व्याजदर
हे वाचा - निफ्टीने गाठला 14,000 चा विक्रमी टप्पा; वर्षाच्या शेवटच्या दिवशी गुंतवणूकदारांना दिलासा
अल्पबचत योजना प्रामुख्याने पोस्टाच्या; तसेच निवडक बॅंकांच्या माध्यमातून राबविल्या जातात. या योजनांवरील व्याजदराचा केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडून दर तिमाही आढावा घेण्यात येतो.