एक हजाराची नवी नोट येणार नाही : शक्तिकांत दास

वृत्तसंस्था
बुधवार, 22 फेब्रुवारी 2017

एक हजार रुपयांची नोट आणण्याची कोणतीही योजना नाही. रुपये 500 आणि कमी किंमतीच्या नोटांची निर्मिती आणि वितरणावर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. एटीएममध्ये पैसे नसल्याच्या तक्रारींची दखल घेण्यात आली आहे. प्रत्येकाला विनंती आहे की, आवश्‍यकता आहे तेवढीच रक्कम एटीएममधून काढावी. अनावश्‍यक रक्कम काढल्याने इतर लोक वंचित राहतात.
- शक्तिकांत दास, केंद्रीय अर्थसचिव

नवी दिल्ली - एक हजार रुपयांची नवी नोट चलनात येणार असल्याचे वृत्त माध्यमांमधून प्रसिद्ध झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय अर्थसचिव शक्तिकांत दास यांनी एक हजार रुपयांनी नवी नोट येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

दास यांनी ट्विटरद्वारे स्पष्टीकरण दिले आहे. 'एक हजार रुपयांची नोट आणण्याची कोणतीही योजना नाही. रुपये 500 आणि कमी किंमतीच्या नोटांची निर्मिती आणि वितरणावर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे.' एटीएममध्ये नोटा उपलब्ध नसल्याच्या तक्रारीबाबत स्पष्टीकरण देताना त्यांनी लिहिले आहे की, 'एटीएममध्ये पैसे नसल्याच्या तक्रारींची दखल घेण्यात आली आहे. प्रत्येकाला विनंती आहे की, आवश्‍यकता आहे तेवढीच रक्कम एटीएममधून काढावी. अनावश्‍यक रक्कम काढल्याने इतर लोक वंचित राहतात.'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोव्हेंबरमध्ये नोटाबंदीचा निर्णय घेतला होता. त्यानंतर 500 आणि 2000 रुपयांच्या नव्या नोटा चलनात आल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर एक हजार रुपयांची नवी नोट नोट चलनात येणार असल्याची चर्चा होती. मात्र, दास यांच्या स्पष्टीकरणामुळे या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

Web Title: No new note of Rs. 1000 : Shaktikant Das