सर्वेक्षणे, प्रश्नमंजुषांमार्फत अनुदान आणि बक्षिसे नाहीत, पोस्टाकडून खुलासा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Indian Post

सर्वेक्षणे, प्रश्नमंजुषांमार्फत अनुदान आणि बक्षिसे नाहीत, पोस्टाकडून खुलासा

मुंबई - सर्वेक्षणे किंवा प्रश्नमंजुषा या माध्यमातून पोस्ट खात्यामार्फत सरकारी सबसिडी किंवा योजनांचा लाभ मिळवण्याच्या समाजमाध्यमांवरील खोट्या संदेशांपासून सावध राहण्याचे आवाहन पोस्ट खात्याने केले आहे. सध्या अशा प्रकारचे अनेक संदेश समाजमाध्यमांवरून प्रसारित होत आहेत. त्यात पोस्टामार्फत काही प्रश्नोत्तरे, सर्वेक्षणे, प्रश्नमंजुषा यांच्या माध्यमातून सरकारची अनुदाने किंवा योजनांचा लाभ मिळेल असे सांगितले जात आहे. मात्र सर्वेक्षणे, प्रश्नउत्तरे किंवा प्रश्नमंजुषा यांच्या आधारे अनुदाने, बोनस या बक्षीस देण्याच्या कोणत्याही योजनेत पोस्ट खाते सहभागी नाही.

त्यामुळे लोकांनी अशा संदेशांवर विश्वास ठेवू नये किंवा त्यांना प्रतिसादही देऊ नये. अशा संदेशांच्या उत्तरात आपली जन्मतारीख, बँक खाते क्रमांक, मोबाईल क्रमांक, पॅनकार्ड-आधार क्रमांक किंवा ओटीपी अशी माहिती देऊ नका, असेही आवाहन पोस्टखात्याने केले आहे. यासंदर्भात पोस्टखातेही आवश्यक उपाययोजना करीत आहे. मात्र अशा संदेशांपासून सावध राहण्याचे आवाहनही पोस्ट खात्याने केले आहे.

Web Title: No Post Grants Prices Through Surve Quizzes

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top