नरेंद्र मोदींचा 'तो' निर्णय म्हणजे घोडचूकच: मोदींचे माजी सल्लागार

वृत्तसंस्था
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

नवी दिल्ली: 8 नोव्हेंबर 2016 देशावर लादलेला नोटबंदीचा निर्णय प्रचंड धक्कादायक आणि घोडचूकच असल्याचं स्पष्ट मत मोदी सरकारचे माजी आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांनी मांडले आहे. नोटबंदीमुळे देशाचा आर्थिक विकास मंदावून असंघटित क्षेत्राचे मोठे नुकसान झाले अशा स्पष्ट शब्दात अरविंद सुब्रमण्यम यांनी मोदी सरकारला फटकारले आहे. अरविंद सुब्रमण्यम यांनी जून महिन्यात मुख्य आर्थिक सल्लागारपदाचा राजीनामा दिला होता. सुब्रमण्यम यांनी त्यांचे आगामी पुस्तक 'ऑफ काउन्सिल: द चॅलेंज ऑफ द मोदी-जेटली इकॉनॉमी' मध्ये हा खुलासा केला आहे.  

नोटबंदीच्या निर्णयाचे अभूतपूर्व असं वर्णन करून कोणत्याही देशाने सर्वकाही सुरळीत सुरु असताना अशा प्रकारे चलन बदल केला नसल्याचे म्हटले आहे. युद्ध किंवा आर्थिक स्थिती खराब झालेल्या परिस्थितीत जगात असे निर्णय घेण्यात आले मात्र, देशातील निर्णय अभूतपूर्व आणि नियोजनशून्य असल्याचे म्हटले आहे. मात्र, त्यांनी 500 किंवा 1000 रुपयांच्या नोटा बदलताना विश्वासात घेतले गेले किंवा नाही यावर भाष्य केले नाही. 

या निर्णयामुळे एकाच फटक्यात चलनात असलेल्या 86 टक्के नोटा परत मागवण्यात आल्या. याचा परिणाम देशाच्या आर्थिक विकासावर झाला. खरंतर, आधीपासूनच आर्थिक विकास मंदावला होता. मात्र, नोटाबंदीच्या निर्णयामुळे यात भर पडली, असे त्यांनी सांगितले. नोटाबंदीच्या अगोदर विकास दर 8 टक्के होता. पण नोटाबंदीनंतरच्या तिमाहीत विकास दर 6.8 वर घसरला, असे त्यांनी सांगितले.’द टू पझल्स ऑफ डिमोनेटायझेशन- पॉलिटिकल अँड इकॉनॉमिक’ या पुस्तकात त्यांनी हे मत मांडले आहे.

5 डिसेंबर रोजी अरविंद सुब्रमण्यम यांचे पुस्तक प्रकाशित होणार आहे. सध्या सुरु असलेला निवडणुकांचा काळ पाहता सुब्रमण्यम यांचे पुस्तक मोदी सरकारला नवीन डोकेदुखी ठरणार यात शंका नाही. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Note ban was a massive, draconian, monetary shock:Arvind Subramanian