आता तुम्ही देखील सुरु करू शकता स्वतःचा व्यवसाय! 

Amul.jpg
Amul.jpg

एक देश आणि एक कर म्हणून लागू करण्यात आलेल्या सदोष जीएसटी आणि नोटाबंदीमुळे आधीच गडगडलेल्या अर्थव्यवस्थेत कोरोनाच्या संकटामुळे अजूनच भर पडली. त्यामुळे बर्‍याच जणांना आपल्या नोकर्‍या गमावल्या. कोरोनाला अटकाव करण्यासाठी म्हणून लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे मोठ्या प्रमाणावर वेतनकपातीसह कामगारकपात झाली. मात्र आता पुन्हा टाळेबंदीच्या नियमात शिथिलता दिल्यानंतर कंपन्यांनी पुन्हा रोजगार निर्माण करण्यास सुरवात केली आहे, परंतु बरेच लोक अजूनही बेरोजगार आहेत. असे लोक आपला व्यवसाय सुरू करु शकतात. 

सध्या देशातील सर्वात मोठी दुग्धजन्य निर्माता कंपनी अमूल व्यवसाय करण्याची उत्तम संधी देत ​​आहे. कंपनी अत्यंत कमी किंमतीत फ्रँचायझी देत ​​आहे. त्यामुळे कमी पैसे गुंतवून आपण आपला स्वतःचा व्यवसाय सुरु करू शकता. अमूलकडून विना रॉयल्टी किंवा प्रॉफिट शेअरिंग शिवाय फ्रँचायझी देण्यात येत आहे. अमूलकडून दोन प्रकारच्या फ्रँचायझी देण्यात येत आहेत. यामध्ये एक अमूल आउटलेट किंवा अमूल रेल्वे पार्लर असेल. तर दुसरे अमूल आईस्क्रीम स्कूपिंग पार्लरची फ्रँचायझी असणार आहे. 

अमूल आउटलेट सुरू करण्यासाठी सुमारे दोन लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. तर अमूल आईस्क्रीम स्कूपिंग पार्लरसाठी पाच लाख रुपये गुंतवावे लागणार आहेत. आणि नॉन रिफंडेबल ब्रँड सिक्युरिटी म्हणून 25 ते 50 हजार रुपये भरावे लागणार आहेत. व सगळ्यात महत्वाचे म्हणजे अमूल आउटलेट मध्ये उत्पादनांवर एमआरपीवर पैसे मिळवता येणार आहे. दुधाच्या उत्पादनावर दहा टक्के आणि आइस्क्रीम सारख्या उत्पादनांवर वीस टक्के पैसे मिळणार आहे. अमूल आईस्क्रीम स्कूपिंग पार्लर मध्ये प्रत्येक उत्पादनानुसार पन्नास टक्के पैसे मिळणार आहेत. 

याशिवाय, फ्रँचायझी मिळवण्यासाठी अमूलच्या आउटलेट करिता 150 चौरस फूट आणि अमूल आईस्क्रीम पार्लरला किमान 300 चौरस फूट जागा आवश्यक असणार आहे. त्यानंतर फ्रँचायझी चालू करण्यासाठी retail@amul.coop या इमेल वर अर्ज करू शकता. तसेच http://amul.com/m/amul-scooping-parlours या वेबसाईट वर जाऊन फ्रँचायझी विषयी माहिती घेऊ शकता.    

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com