तेल आयात महागणार  

वृत्तसंस्था
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

नवी दिल्ली - आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये भारताच्या खनिज तेल आयातीच्या खर्चात २६ अब्ज डॉलर वाढ होण्याची शक्‍यता आहे. रुपयातील घसरणीमुळे तेलाच्या आयातीचा खर्च वाढत आहे. 

नवी दिल्ली - आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये भारताच्या खनिज तेल आयातीच्या खर्चात २६ अब्ज डॉलर वाढ होण्याची शक्‍यता आहे. रुपयातील घसरणीमुळे तेलाच्या आयातीचा खर्च वाढत आहे. 

डॉलरच्या तुलनेत रुपयात घसरण होत आहे. यामुळे देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरातही वाढ होत आहे. भारतातील एकूण मागणीपैकी ८० टक्के खनिज तेल आयात करण्यात येते. मागील आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये भारताने २२.०४३ कोटी टन खनिज तेल आयात केले होते. यासाठी ८७.७ अब्ज डॉलर (५.६५ लाख कोटी रुपये) खर्च झाले होते. चालू आर्थिक वर्षात २२७ टन खनिज तेलाची आयात झाली आहे. चालू आर्थिक वर्षात खनिज तेलाचा भाव सरासरी ६५  डॉलर प्रतिबॅरल आणि डॉलरचा भाव सरासरी ६५ रुपये राहील, असा अंदाज आहे. 

चालू आर्थिक वर्षात खनिज तेलाच्या आयातीचा खर्च १०८ अब्ज डॉलरवर जाण्याची शक्‍यता आहे. चालू वर्षात डॉलरचा भाव ७० रुपयांपर्यंत राहिल्यास तेलाच्या आयातीचा खर्च ११४ अब्ज डॉलरवर जाईल. 

पेट्रोल, डिझेल भडकले 
दिल्लीत आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर ६ पैसे वाढ करण्यात आली. यामुळे पेट्रोल प्रतिलिटर ७७.२० रुपये आणि डिझेल प्रतिलिटर ६८.७८ रुपयांवर गेले. मागील दोन महिन्यांतील हा उच्चांकी भाव आहे. जागतिक पातळीवर खनिज तेलाच्या भावात वाढ सुरू असल्याने किरकोळ दरात आगामी काळात आणखी वाढ सुरू राहणार आहे.

Web Title: Oil imports will be expensive