“ओला”ला 2313 कोटींचा तोटा

वृत्तसंस्था
मंगळवार, 2 मे 2017

ऍपबेस्ड कॅब सेवा गाळात , तोट्यात तीनपटीने वाढ

नवी दिल्ली: स्पर्धेत टिकून राहण्यासाठी प्रमोशनवर केलेला अवास्तव खर्च आणि प्रवाशांसाठी देऊ केलेल्या सवलतीने "ओला"चा आर्थिक कंबरडा मोडला आहे. ऍपबेस्ड कॅब सेवा देणाऱ्या "ओला"ला 31 मार्चअखेर संपलेल्या आर्थिक वर्षात 2 हजार 313 कोटींचा तोटा झाला आहे. प्रमोशनबरोबरच वेतनेतर खर्चात वार्षिक खर्चात वाढ झाल्याचे कंपनीच्या तोट्यात तीनपट वाढ झाली आहे.

सध्या कॅब सेवा क्षेत्रात ओला आणि उबेरमध्ये अटीतटीची स्पर्धा आहे. प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी दोन्ही कंपन्यांनी सवलतींची खैरात केली आहे. त्याचबरोबर वाहन चालकांनाही भरघोस वेतन दिले जात आहे."ओला"ला याची मोठी किंमत मोजावी लागली आहे. कंपनीच्या तोट्यात तीनपट वाढ झाली असली तरी महसूल मात्र सातपटीने वाढली आहे. 2016-17 या वर्षात 758 कोटींचा महसूल मिळाल्याचे कंपनीने म्हटले आहे. त्याआधीच्या वर्षात कंपनीला 103 कोटींचा महसूल मिळाला होता. दरम्यान गेल्या वर्षभरात कंपनीने कर्मचाऱ्यांच्या वेतनावर 381 कोटी, जाहिराती आणि प्रमोशनसाठी 437 कोटी आणि तंत्रज्ञानावर 120 कोटी खर्च केले आहेत. दरम्यान, तोटा वाढल्याने ओलामधील गुंतवणूकदारांच्या चिंतेत भर पडली आहे. यामुळे कंपनीच्या बाजारातील मूल्यावर परिणाम होण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे.

Web Title: Ola declares loss of Rs. 2313 crore in fiscal year 2015-16