‘ओला’मध्ये 350 दशलक्ष डॉलरची गुंतवणूक

वृत्तसंस्था
सोमवार, 27 फेब्रुवारी 2017

मुंबई: कॅब सेवा पुरविणारी स्थानिक कंपनी 'ओला'ने काही नव्या आणि विद्यमान गुंतवणूकदारांकडून सुमारे 350 दशलक्ष डॉलरचा निधी उभारला आहे. मात्र, या गुंतवणूक फेरीनंतर कंपनीचे मूल्यांकन साडेतीन अब्ज डॉलरएवढे झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. याआधी कंपनीचे मूल्यांकन तब्बल पाच अब्ज डॉलरएवढे होते.

या फेरीत ओलामध्ये सॉफ्टबँकेसह सिक्विया कॅपिटल आणि टायगर ग्लोबलसारख्या कंपन्यांनी गुंतवणूक केली आहे. कंपनी गेल्या सहा महिन्यांपासून हा निधी उभारण्याच्या प्रयत्नात होती. अखेर, कंपनीला अपेक्षेपेक्षा कमी प्रमाणात निधी उपलब्ध झाला. ओलाने आपल्या स्थापनेपासून तब्बल 1.2 अब्ज डॉलरचा निधी उभारला आहे. उबेरसोबत तीव्र स्पर्धा करणाऱ्या ओलासाठी ही गुंतवणूक फेरी काहीशी दिलासादायक ठरु शकते.

Web Title: Ola gets $350 million in fresh funding