गहुंजे परिसरात गृहखरेदीसाठी संधी 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 एप्रिल 2018

पुणे - पुणे परिसरात घर घेण्याचा विचार करणाऱ्या नागरिकांकरिता पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावरील गहुंजे परिसरात परवडणाऱ्या घरांचे नव्याने अनेक पर्याय उपलब्ध होत आहेत. या परिसरासह नऊ गावांचा महापालिकेत समावेश व्हावा, असा पिंपरी- चिंचवड महापालिकेचा प्रस्ताव असल्याने पुणे शहराच्या प्रवेशद्वारावर असलेल्या गहुंजे परिसरात जगभरात उत्तम ठरलेले शहरीकरणाचे मॉडेल येण्याची शक्‍यता आहे.

परवडणाऱ्या घरांच्या वाढत्या मागणीमुळे देशातील रिअल इस्टेट क्षेत्रात मोठ्या संधी निर्माण होत आहेत. या पार्श्‍वभूमीवर नजीकच्या भविष्यात गहुंजे परिसर राहण्यासाठी आणि घरातील गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम असणार आहे, असे पेनिन्सुला लॅंड लि.चे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राजीव पिरामल यांनी म्हटले आहे. परवडणाऱ्या घरांच्या बांधणीला वेग यावा यासाठी सरकारकडूनही प्रयत्न होत आहेत. ‘सर्वांसाठी घरे’ या मुद्द्याबरोबरच ‘सर्वांसाठी सर्वोत्तम सुखसोयी’ हा मंत्र घेऊन पेनिन्सुला लॅंडने गहुंजे येथे ‘ॲड्रेस वन’ हा परवडणारा लक्‍झरी प्रोजेक्‍ट सुरू केला आहे. 

जवळच्या अंतरावर सुसज्ज रुग्णालये, उत्तम शिक्षण संस्था, आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम आणि पिंपरी व वाकड अशा नव्याने विकसित होत असलेल्या बाजारपेठा अशा सोयी असलेला गहुंजे परिसर रस्ते आणि रेल्वेने पुणे- मुंबईशी जोडलेला आहे. हिंजवडी, तळवडे येथील आयटी पार्कही या परिसराच्या जवळच आहेत. पुणे आणि मुंबई या दोन्ही शहरांमधल्या लोकांच्या दृष्टीने सोयीचे असल्याने काही वर्षांपूर्वीपर्यंत छोटेसे खेडे असणारे गहुंजे गाव आता अनेकांच्या दृष्टीने राहण्यासाठी अत्यंत योग्य ठिकाण झाले आहे.

परवडणाऱ्या किमतीमध्ये सर्वांसाठी उत्तम सुख-सोयी या कल्पनेबाबत गृहखरेदीदारांमध्ये प्रचंड उत्सुकता असल्याचे आमच्या प्राथमिक पाहण्यांमध्ये दिसून आले आहे, असे ॲनॉरॉक प्रॉपर्टी कन्सल्टन्टस्‌ प्रा.लि.चे अध्यक्ष अनुज पुरी यांनी गहुंजे परिसरातील गुंतवणुकीच्या संधींविषयी बोलताना सांगितले. गहुंजे परिसरातील पायाभूत सुविधांचा विकास वेगाने होत असल्याने नजीकच्या काळात येथील घरांच्या किमती वाढण्याची शक्‍यता आहे. केवळ पुणे- मुंबईतूनच नव्हे, तर महाराष्ट्राच्या इतर भागांतूनही परवडणाऱ्या घरांना मागणी आहे, असेही पुरी म्हणाले.

Web Title: The opportunity for home-buying in the Ghahunje area