‘स्टेंट’च्या किमतीवरून रुग्णालयांना नोटिसा

वृत्तसंस्था
शनिवार, 25 फेब्रुवारी 2017

नवी दिल्ली/मुंबई: हृदयशस्त्रक्रियेसाठी लागणाऱ्या "स्टेंट'ची मर्यादेपक्षा अधिक किंमत आकारल्याचे आरोप मॅक्‍स हेल्थकेअर आणि लीलावती रुग्णालयाने फेटाळले आहेत. या दोन्ही रुग्णालयांना राष्ट्रीय औषधे किंमत प्राधिकरणाने (एनपीपीए) नोटिसा बजावल्या आहेत.

दिल्लीतील साकेतमधील मॅक्‍स हेल्थकेअरने "एनपीपीए'च्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन तातडीने सुरू केल्याचे म्हटले आहे. याचबरोबर मुंबईतील लीलावती रुग्णालयाने "स्टेंट'च्या किमतीबाबत असलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करीत असल्याचा दावा केला आहे. तसेच, "एनपीपीए'कडून अद्याप नोटीस मिळाली नसल्याचे म्हटले आहे. "एनपीपीए'ने "स्टेंट'ची मर्यादेपेक्षा अधिक किंमत आकारणाऱ्या काही रुग्णालयांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. यात लीलावती रुग्णालय (मुंबई), मॅक्‍स हेल्थकेअर (दिल्ली), मेट्रो हॉस्पिटल (फरीदाबाद), पीजीआय (चंडीगड) आणि राम मूर्ती हॉस्पिटल (बरेली) यांचा समावेश आहे. राज्यांच्या औषध नियंत्रण संस्थांना "स्टेंट'च्या किमतीच्या मर्यादेची योग्य अंमलबजावणी करण्याची सूचना "एनपीपीए'ने केली आहे.

Web Title: Overpriced stents: NPPA issues notice to two hospitals