पाकिस्तानी रुपया रसातळाला

वृत्तसंस्था
सोमवार, 3 डिसेंबर 2018

इस्लामाबाद: पाकिस्तानी रुपया अमेरिकी डॉलरच्या तुलनेत तळाला पोचला आहे. परकीय चलनाचा तुटवडा निर्माण झाल्याने पाकिस्तानी रुपया नीचांकी पातळीवर पोचला आहे. एका अमेरिकी डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी रुपया १४४ रुपयांवर पोचला आहे. पाकिस्तानमध्ये  इम्रान खान यांचे सरकार सत्तेत आल्यापासून परदेशी गुंतवणूक वाढावी यासाठी मोठे प्रयत्न सुरु आहेत. 

गेल्या आठवड्यात पाकिस्तानी रुपया अमेरिकी डॉलरच्या तुलनेत १३४ रुपयांवर व्यवहार करत बंद झाला होता. मात्र शुक्रवारी रुपयामध्ये दहा रुपयांची मोठी घसरण झाली. पाकिस्तानकडून डॉलरची मागणी मोठ्या प्रमणावर वाढल्याने पाकिस्तानी रुपयात मोठी घसरण झाली. पाकिस्तान सतत इतर देशांकडे आर्थिक मदतीसाठी याचना करतो आहे. शिवाय इतर देशांकडून मोठ्या प्रमाणावर कर्ज उभारण्याची शक्यता निर्माण झाल्याने पाकिस्तानी रुपयामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली. त्याचप्रमाणे पाकिस्तानची अंतर्गत परिस्थिती बिघडली असून सरकार अर्थव्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी इम्रान खान सरकार कर वाढविण्याबाबत विचार करत आहेत. भारताप्रमाणेच पाकिस्तानचे खान सरकार काळा पैसा पुन्हा देशात आणण्यासाठी नवीन कायदा आणण्याची शक्यता आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pakistan rupee hits record low against US dollar