मोदींच्या मास्टरस्ट्रोकने पाकिस्तानला आणखी एक झटका 

वृत्तसंस्था
सोमवार, 5 ऑगस्ट 2019

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवण्याच्या मास्टरस्ट्रोकमुळे  'पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज' ही कोसळले

कराची: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवण्याच्या मास्टरस्ट्रोकमुळे  'पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज' ही कोसळले. सकाळी ज्यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह संसदेत काश्मीरच्या विषयावर निवेदन करताना जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवण्याची शिफारस मांडली. तसेच जम्मू काश्मीर राज्याचे विभाजन करून लडाख हा केंद्र शासित प्रदेश म्हणून उदयास येणार आहे. त्यावेळी मात्र याचा सर्वाधिक धक्का पाकिस्तानला बसला. भारताने घेतलेल्या धाडसी निर्णयाने पाकिस्तानी शेअर बाजार 'धडाम' कोसळला. 

पाकिस्तानी अर्थव्यवस्था आधीच मरणावस्थेत आहे. त्यात आज शेअर बाजारात घसरणीचा पुन्हा एकदा मोठा झटका बसला. भारताने कलम 370 हटवण्याच्या निर्णय ज्यावेळी अमित शहांनी घेतला त्याचवेळी त्यांच्या भाषणादरम्यान पाकिस्तानचा शेअर बाजार कोसळला. पाकिस्तानच्या शेअर बाजारात झालेली वर्षभरातली ही सर्वात मोठी घसरण ठरली आहे. पाकिस्तानी शेअर बाजाराचा प्रमुख बेंचमार्क इंडेक्स केएसई-100 हा 600 अंकांनी घसरून 31 हजार 100 वर आला. गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत त्यात 1.75 टक्क्यांची घसरण झाली.

भारतीय शेअर बाजाराही  सकाळच्या सत्रात घसरला होता. मात्र जसे अमित शहा यांचे भाषण संपले तसा भारतीय शेअर बाजार सावरला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pakistan's stock market, Karachi Stock Exchange crashes