खोट्या 'SMS' प्रकरणी 'रुची सोया'ची पोलिस तक्रार

पतंजलीची उपकंपनी रुची सोया हिच्या एफपीओ संदर्भात खोटे संदेश प्रसारित झाल्याप्रकरणी कंपनीने हरिद्वार पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे
Ruchi Soya
Ruchi Soya

मुंबई : पतंजलीची उपकंपनी रुची सोया हिच्या एफपीओ संदर्भात खोटे संदेश प्रसारित झाल्याप्रकरणी कंपनीने हरिद्वार पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे.

यासंदर्भात कंपनीच्या नावे काहीजणांनी खोटे संदेश समाजमाध्यमांवर प्रसारित केले आहेत. कंपनीच्या शेअरमधील गुंतवणुकीसंदर्भात हे संदेश होते. मात्र कंपनीने किंवा कंपनीच्या कोणत्याही संचालक, प्रवर्तक, अधिकारी यांनी ही माहिती दिली नाही, असे रुची सोया तर्फे मुंबई शेअर बाजाराला कळविण्यात आले आहे. या बोगस संदेशांप्रकरणी आयटी कायदा तसेच भारतीय दंडसंहितेचे कलम ४२० (फसवणुक) नुसार तपास करावा, असेही या तक्रारीत म्हटले आहे.

या एफपीओ मध्ये गुंतवणुक केलेल्या मोठ्या संस्थात्मक गुंतवणुकदारांखेरीज (अँकर इन्व्हेस्टर) सर्व गुंतवणुकदारांना या शेअर खरेदीसाठी केलेली आपली बोली (अर्ज) ३० मार्च पर्यंत मागे घेता येईल. पाच एप्रिल रोजी कोणाला किती शेअर मिळतील ते निश्चित होईल. सात एप्रिल रोजी ते शेअर गुंतवणुकदाराच्या डिमॅट खात्यात जमा होतील व दुसऱ्या दिवसापासून त्या शेअरचे व्यवहार शेअरबाजारात करता येतील, असेही कंपनीने स्पष्ट केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com