esakal | पतंजलीचा २५० कोटींचा एनसीडी इश्यू  विकला गेला फक्त तीन मिनिटांत
sakal

बोलून बातमी शोधा

Baba-Ramdev

बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेदने नॉन कन्व्हर्टीबल डिबेंचरचा (एनसीडी) इश्यू बाजारात आणला आहे. पतंजलीचा हा इश्यू २५० कोटी रुपयांचा आहे. एनसीडी बाजारात खुला झाल्यानंतर फक्त तीनच मिनिटांत गुंतवणूकदारांनी हा इश्यू विकत घेतला आहे किंवा पूर्णपणे सब्स्क्राईब्ड केला आहे. पतंजलीच्या एनसीडीला ब्रिकवर्कने एए चे पतमानांकन दिले आहे.

पतंजलीचा २५० कोटींचा एनसीडी इश्यू  विकला गेला फक्त तीन मिनिटांत

sakal_logo
By
पीटीआय

कोरोना काळात वाढलेला पतंजलीच्या उत्पादनांचा खप
बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेदने नॉन कन्व्हर्टीबल डिबेंचरचा (एनसीडी) इश्यू बाजारात आणला आहे. पतंजलीचा हा इश्यू २५० कोटी रुपयांचा आहे. एनसीडी बाजारात खुला झाल्यानंतर फक्त तीनच मिनिटांत गुंतवणूकदारांनी हा इश्यू विकत घेतला आहे किंवा पूर्णपणे सब्स्क्राईब्ड केला आहे. पतंजलीच्या एनसीडीला ब्रिकवर्कने एए चे पतमानांकन दिले आहे. या एनसीडीच्या माध्यमातून उभारलेल्या भांडवलाचा उपयोग पतंजली आयुर्वेद, कंपनीच्या खेळत्या भांडवलासाठी किंवा वर्किंग कॅपिटलसाठीच्या तरतूदीसाठी आणि पुरवठा साखळीच्या (सप्लाय चेन नेटवर्क) सक्षमीकरणासाठी करणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पतंजली आयुर्वेद ही हरिद्वारस्थित कंपनी आहे. पतंजली आयुर्वेदच्या एनसीडीचा कुपन रेट किंवा व्याजदर १०.१ टक्के इतका आहे. या एनसीडीचा कालावधी तीन वर्षांचा असणार आहे. स्टॉक मार्केटमध्ये नोंदणी झालेले एनसीडी हे रिडिमेबल असतात म्हणजेच गुंतवणूकदार त्यातून गुंतवणूक काढून घेऊ शकतात. रामदेव बाबांच्या पतंजली आयुर्वेदचा हा पहिलाच एनसीडी इश्यू आहे. 

शेअर बाजारामध्ये उसळी, सेन्सेक्सने ओलांडली ३२,०००ची पातळी 

कोविड-१९च्या संकटकाळात आयुर्वेदआधारित उत्पादनांची मागणी वाढली आहे. कारण त्यामुळे रोगप्रतिकार क्षमता वाढत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. पतंजलीच्या आयुर्वेद आधारित उत्पादनांच्या आणि इतर उत्पादनांच्या मागणीत सद्यस्थितीत तिपटीने वाढ झाली आहे.

मात्र उत्पादनांना बाजारात मागणी वाढल्यामुळे कंपनीच्या पुरवठा आणि वितरण साखळीवर दबाव निर्माण झाला आहे. कंपनीच्या उत्पादन प्रकल्पावरील दबावदेखील वाढला आहे. या पुरवठा आणि वितरण साखळीच्या आणि उत्पादन क्षमतेच्या सक्षमीकरणासाठी कंपनी एनसीडीद्वारे उभारलेल्या भांडवलाचा वापर करणार असल्याचे पतंजली आयुर्वेदकडून सांगण्यात आले आहे. 

श्रीमंत व्हायचंय, मग लक्षात घ्या 'हे' ७ अर्थमंत्र...

मागील वर्षी डिसेंबर महिन्यात पतंजली आयुर्वेदने दिवाळखोर झालेल्या रुची सोयाचे संपादन केले होते. पतंजली आयुर्वेदने ४,३५० कोटी रुपयांना रुची सोयाला विकत घेतले होते. रुची सोया ही कंपनी फूड प्रॉडक्ट्स बनवते. न्युट्रेला हा ब्रॅंड रुची सोयाचाच आहे. दिवाळखोरी आणि नादारीच्या कायद्याअंतर्गत (आयबीसी) रुची सोयाचे संपादन पतंजली आयुर्वेदने केले होते.

आरबीआय बाॅंड्समध्ये गुंतवणूक करण्याची शेवटची संधी...

"सद्यपरिस्थितीत कोरोनाच्या संकटामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे उद्योग-धंद्यांसमोर मोठे आव्हान निर्माण केले आहे. बहुतांश उद्योगांना भांडवलाची आवश्यकता भासते आहे. पतंजली आयुर्वेदच्या सप्लाय चेन नेटवर्कला मजबूत करण्याची कंपनीची योजना आहे. सद्य परिस्थितीत उत्पादन करण्याबरोबरच सप्लाय चेन ही उद्योगांसाठी महत्त्वाची बाब आहे. उद्योगाच्या किंवा कंपनीच्या विविध गरजा भागवण्यासाठी, योजना राबवण्यासाठी आणि कामकाज सुरू ठेवण्यासाठी खेळत्या किंवा कार्यान्वित भांडवलाची आवश्यकता असते. पतंजली या एनसीडीच्या माध्यमातून उभारलेल्या भांडवलाचा वापर उत्पादन क्षमतेपासून वितरण क्षमता वाढवण्यासाठी करणार आहे" असे मत ललित पोफळे, सीए, पुणे यांनी व्यक्त केले आहे.

loading image
go to top