‘पेटीएम’ बचत खात्यावर देणार 4 टक्के व्याज

वृत्तसंस्था
बुधवार, 24 मे 2017

नवी दिल्ली: पेटीएमची बहुप्रतिक्षित पेमेंट्स बॅंकेचे कामकाज आजपासून (मंगळवार) सुरू झाले आहे. आता इतर बँकांप्रमाणेच त्यामध्ये तुम्हाला बचत खाते उघडता येणार आहे. पेटीएमकडून बचत खात्यावर 4 टक्के दराने व्याज देण्यात येणार आहे. 2020 पर्यंत बँकेने 50 कोटी ग्राहक जोडण्याचे लक्ष्य ठेवले आहे. बॅंकेकडून नॉन मेट्रो शहरांमध्ये दरमहा पाच मोफत एटीएम व्यवहार करता येणार आहे. पाचवेळा एटीएममधून पैसे काढल्यास कोणतेही शुल्क आकारले जाणार नसून त्यानंतर 20 रुपये शुल्क आकारले जाणार आहे.

बँकेत खाते उघडणार्‍या पहिल्या दहा लाख ग्राहकांना बॅंकेने एक ऑफर देऊ केली आहे. यामध्ये 25 हजार रुपये ठेवीने खाते उघडल्यास अशा ग्राहकाला तत्काळ रु.250 कॅशबॅक मिळणार आहे. अन्य बँकांप्रमाणेच येथे खाते उघडता येणार असून मोफत ऑनलाइन व्यवहार करता येणार आहे. तसेच प्रत्येकाला पासबुक, डेबिट कार्ड, चेकबुक दिले जाणार आहे. पहिल्या वर्षामध्ये पेटीएमने 31 शाखा आणि 3,000 ग्राहक सेवा केंद्र उघडण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे

 पेटीएम मोबाईल वॉलेट

पेटीएम मोबाईल वॉलेट असलेल्यांना त्यांचे पैसे या पेमेंट बँकेत टाकता येण्याची सुविधा दिली असून त्यावर बचत खात्याप्रमाणे व्याज दिले जाणार आहे.

'पेमेंट्स बँक' म्हणजे काय आहे?

बचत खात्यांची सुविधा देण्याच्या कल्पनेने 'पेमेंट्स बँक'ची संकल्पना पुढे आली आहे. या बँकांमार्फत प्रामुख्याने स्थलांतरित कामगार काम करणार्‍या लोकांपैकी, कमी उत्पन्न घरांना, लहान व्यवसाय करणार्‍यांना आणि इतर असंघटित क्षेत्रातील संस्थांना पैसे आणि आर्थिक व्यवहार करता यावा यासाठी रिझर्व्ह बँकेने ही संकल्पना सादर केली आहे. या बँकांमध्ये एक लाख रुपयांपर्यंत ठेवी जमा केल्या जाऊ शकतात.

Web Title: Paytm Payments Bank to pay 4% on savings account