स्नॅपडीलने सोडचिठ्ठी दिलेल्यांना पेटीएमकडून निमंत्रण

वृत्तसंस्था
सोमवार, 27 फेब्रुवारी 2017

नवी दिल्ली: मोबाईल वॉलेट कंपनी 'पेटीएम'ने स्नॅपडील आणि स्टेझिलासारख्या कंपन्यांनी सोडचिठ्ठी दिलेल्या कर्मचाऱ्यांना मदतीचा हात देऊ केला आहे. पेटीएमचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय शेखर शर्मा यांनी ट्विटरवरुन या कर्मचाऱ्यांना निमंत्रण दिले आहे.

दिल्लीमधील तंत्रज्ञान आणि उत्पादन क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना उद्देशून केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, "नमस्कार, तुम्हाला व्यवसाय व्यवस्थापनाच्या झळा बसत आहेत का? @पेटीएम आणि @पेटीएम-मॉलमध्ये तुमचे स्वागत आहे".

स्नॅपडीलच्या गेल्या आठवड्यात कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यासंबंधी घोषणेनंतर शर्मा यांचे ट्विट सूचक ठरत आहे. त्याचप्रमाणे, हॉटेल बुकिंग कंपनी स्टेझिलाने नवे बिझनेस मॉडेल तयार होईपर्यंत आपला व्यवसाय बंद ठेवण्याची घोषणा केली होती. यामुळे दोन्ही कंपन्यांमधील अनेक कर्मचाऱ्यांना आता नारळ मिळणार आहे.

याऊलट, केंद्राने जाहीर केलेल्या नोटाबंदीचा पेटीएमला झालेला फायदा दृश्य आहे. आर्थिक व्यवहारातून पाचशे व हजारांच्या नोटा बाद झाल्याने अनेकांनी पेटीएमच्या मोबाईल वॉलेटचा पर्याय स्विकारला. परिणामी, कंपनीच्या व्यवसायात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.

Web Title: Paytm sniffs deal in laid-off talent from Snapdeal and Stayzilla