Pension scheme | पती-पत्नीला मिळणार १० हजार रुपये पेन्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pension scheme

Pension scheme : पती-पत्नीला मिळणार १० हजार रुपये पेन्शन

मुंबई : देशातील सर्वसामान्यांना मदत करण्यासाठी केंद्र सरकार अनेक प्रकारच्या योजना राबवत असते. या योजनांचा लाभ घेऊन सर्वसामान्य नागरिक त्यांचे भविष्य सुरक्षित करू शकतात. भारत सरकारने असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी एक योजना आणली आहे, ज्याअंतर्गत लोकांना पेन्शनची सुविधा दिली जाईल.

सरकारने या योजनेला अटल पेन्शन योजना असे नाव दिले होते. या योजनेशी संबंधित लोकांना वयाच्या 60 वर्षांनंतर 5000 रुपये पेन्शन मिळते. तुम्ही तुमच्या वयानुसार या योजनेत सहभागी होऊ शकता. अटल पेन्शन योजनेत सामील होऊन, किमान 1000 रुपये आणि कमाल 5000 रुपये मासिक पेन्शन मिळू शकते.

हेही वाचा: Pension scheme : या योजनेत पैसे गुंतवल्यास निवृत्तीनंतर मिळतील दरमहा ७५ हजार

 पेन्शन कशी मिळवाल ?

 अटल पेन्शन योजनेंतर्गत, वयाच्या ६० वर्षांनंतर पेन्शन मिळवण्यासाठी त्यात गुंतवणूक करावी लागते. यामध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला दरमहा ५,००० रुपये पेन्शन मिळते. त्याच वेळी, दरमहा 210 रुपये त्यात जमा करावे लागतील.

 अटल पेन्शन योजनेंतर्गत पती-पत्नी एकत्र आल्यास त्यांना दरमहा 10,000 रुपये पेन्शन मिळू शकते. यासाठी त्यांना वयाच्या ३० व्या वर्षापासून दरमहा ५७७ रुपये जमा करावे लागतील. त्याच वेळी, वयाच्या 60 नंतर, त्यांना पेन्शन म्हणून 10,000 रुपये मिळू लागतील.

हेही वाचा: दर महिन्याला २१० रुपये भरा आणि साठीनंतरची सोय करा

कोण सहभागी होऊ शकतो ?

- असंघटित क्षेत्रात काम करणारा भारतीय नागरिक सरकारच्या या लाभदायक अटल पेन्शन योजनेत सामील होऊ शकतो.

अटल पेन्शन योजनेत सहभागी होण्यासाठी कोणत्याही व्यक्तीचे वय १८ ते ४० वर्षे असावे.

त्याच वेळी, या योजनेत सामील होण्यासाठी, बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते असणे आवश्यक आहे.

Web Title: Pension Scheme Husband And Wife Will Get Rs 10 Thousand Pension Atal Pension Yojana

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Pension