Pension scheme : ५५ रुपयांची गुंतवणूक करा आणि मिळवा ३६ हजार रुपये

प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेंतर्गत नोंदणीचे वय १८ ते ४० वर्षे आहे. नोंदणीनंतर, लाभार्थ्याला दरमहा विमा हप्ता जमा करावा लागेल.
Pension scheme
Pension schemegoogle

मुंबई : आजच्या काळात लोकांच्या गरजा वाढल्या आहेत. त्यामुळे पैशांची कमतरता आहे, अशा परिस्थितीत भविष्यासाठी बचत करणे हे मोठे आव्हान आहे. तुम्हाला आतापासूनच भविष्याचे नियोजन करायचे असेल, तर ही बातमी उपयुक्त ठरणार आहे. ही एक अशी सरकारी योजना आहे ज्यातून तुम्हाला 36,000 रुपये पेन्शन मिळू शकते.

Pension scheme
Government scheme : साठी ओलांडताच खात्यात येतील एवढे पैसे

ही योजना म्हणजे प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना (PM-SYM). हे विशेष पेन्शन असंघटित क्षेत्रात राहणाऱ्या लोकांसाठी आहे. प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेंतर्गत नोंदणीचे वय १८ ते ४० वर्षे आहे. नोंदणीनंतर, लाभार्थ्याला दरमहा विमा हप्ता जमा करावा लागेल. 18 वर्षे पूर्ण करणार्‍या शेतकर्‍याला दरमहा रु. 55 विमा हप्ता भरावा लागेल, तर ज्या शेतकर्‍याचे वय 40 वर्षे पूर्ण झाले आहे त्याला 200 रुपये हप्ता जमा करावा लागेल.

Pension scheme
वृद्धापकाळात कोणावरही अवलंबून राहण्याची गरज नाही; सरकार देणार मासिक पेन्शन

वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर दरमहा ३ हजार रुपये पेन्शन मिळते. भविष्यातील नियोजनासाठी जर कोणत्याही व्यक्तीला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर ते जनसेवा केंद्रात जाऊन त्यांचे पीएम-एसवायएम खाते उघडू शकतात.

यामध्ये तुम्ही कॉमन सर्व्हिस सेंटरमधून तुमचे खाते उघडू शकता. मात्र यासाठी आधार कार्ड आणि बँक पासबुक यांसारखी आवश्यक कागदपत्रे अत्यंत महत्त्वाची आहेत. पीएम श्रम योगी मानधन योजनेत खाते उघडल्यानंतर, अर्जदारासाठी श्रम योगी कार्ड देखील जारी केले जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com