घर खरेदीची हीच योग्य वेळ !

स्वतःचे घर घेण्याची इच्छा आहे, पण सध्या आपले बजेट नाही असे म्हणत घरखरेदी पुढे ढकलली जाते.
Home
Homesakal

स्वतःचे घर घेण्याची इच्छा आहे, पण सध्या आपले बजेट नाही असे म्हणत घरखरेदी पुढे ढकलली जाते. सध्या कोरोनामुळे निर्माण झालेली स्थिती आणि ‘वर्क फ्रॉर्म होम’ अशा काही कारणांमुळे स्वत:च्या घराची सर्वाधिक गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे घर खरेदीची हीच योग्य वेळ आहे. कोरोनाचा फटका बांधकाम व्यवसायालाही बसला असून, सर्वांत कमी दरांमध्ये बांधकाम व्यावसायिक गृहप्रकल्पांची विक्री करीत आहेत. याबरोबरच गृहकर्जावर कमी व्याजदर सध्या आकारला जात असून, घरखरेदीसाठी आवश्‍यक असलेल्या इतर बाबी देखील सध्या पॉझिटिव्ह आहेत.

- सनील गाडेकर

कोरोनात काळात घराचाच आधार

देशात कोरोनाचा प्रसार झाल्यानंतर लाखो लोकांना घराचाच आधार मिळाला आहे. या महामारीच्या काळात घरानेच अनेक लोकांना सुरक्षित ठेवले आणि त्यामुळेच स्वतःचे घर असण्याचे फायदे नागरिकांच्या लक्षात आले. गेल्या दोन वर्षात वर्क फ्रॉम होमचे महत्त्व मोठ्या प्रमाणात वाढले. स्वतःचे मोठे घर असलेल्यांना घरून काम करण्याचा पर्याय सोईस्कर ठरला.

स्वतःच्या राहण्याची सोय

बांधकाम क्षेत्र हा एक ‘फिजिकल ॲसेट’ असल्याने तो हरवू किंवा चोरीला जाऊ शकत नाही. योग्य प्रकारे त्याची काळजी घेतल्या गेल्यास अगदी पुढच्या काही पिढ्यांसाठी देखील तो गुंतवणुकीचा एक महत्त्वपूर्ण पर्याय ठरतो. याबरोबरच जर स्वतःसाठी त्याचा वापर होत नसेल, तर भाडेतत्वावर देऊन देखील यामधून एक खात्रीशीर उत्पन्न मिळण्याची शाश्वती असतेच.

बांधकाम क्षेत्राचे दर वाढते

परवडणाऱ्या घरांचा विचार केल्यास पंतप्रधान आवास योजनेचा मिळणारा फायदा, गरजेच्या वेळी प्रॉपर्टीच्या नावे घेता येणारे कर्ज या सुद्धा या क्षेत्रातील गुंतवणूकदारांसाठी जमेच्या बाजू आहेत. २०१०मध्ये ५० लाख रुपये किंमत असलेल्या घराची सध्याची बाजारभावाची किंमत किमान १ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे, यावरून या क्षेत्राचे सरासरी वाढते दर आणि त्यामागील फायदा आपल्या लक्षात येईल.

‘रेरा’मुळे घरखरेदी सुरक्षित

महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाच्या (महारेरा) कायद्यांमुळे आता गृहखरेदी व त्यामधील गुंतवणूक आणखी सुरक्षित झाली आहे. बांधकाम व्यवसायिकांना दिलेल्या वेळेत घरे हस्तांतरित करावी लागत असल्याने यामध्ये ग्राहकांचाच फायदा आहे. इंटरनेट, चॅनल पार्टनर यामुळे गृहखरेदीची प्रक्रिया सध्या सोपी झाली आहे. नोंदणीसाठी आवश्यक सर्व बाबी बांधकाम व्यावसायिक आणि चॅनल पार्टनर पाहात असल्याने खरेदीदाराला घर खरेदी करणे हे पहिल्यापेक्षा सोपे झाले आहे.

भविष्यात दर वाढण्याची शक्यता

कोरोनाचे रुग्ण कमी झाल्यानंतर बांधकाम क्षेत्र पुन्हा स्थिरावले आहे. मात्र, गेल्या दोन वर्षांत बांधकाम साहित्याच्या किमती सुमारे ३५ टक्क्यांनी वाढल्या आहेत. हीच स्थिती कायम राहिल्या भविष्यात बांधकाम क्षेत्रातील गुंतवणूक महागण्याची शक्यता आहे.

कर्ज घेताना विकसकाची तपासणी

मालमत्ता खरेदीची सर्व नोंदणी ही ऑनलाइन पद्धतीने होत असल्याने यावर सरकारची देखील नजर असते. इतकेच नव्हे, तर कागदपत्रे हरविल्यास सरकारकडून ती पुन्हा मिळविणे देखील आता शक्य आहे. बँक कर्जावर मालमत्ता खरेदी करीत असताना त्याची बँकेच्या वतीने तपासणी होत असल्याने या ठिकाणी देखील सुरक्षिततेच्या दृष्टीने काळजी घेतली जाते.

पदोन्नती व पगारवाढीचा फायदा

परदेशात वास्तव्यास असलेल्या भारतीयांना देखील महामारीच्या या पार्श्वभूमीवर भारतात आपले स्वतःचे घर असावे व भारतातील बांधकाम क्षेत्रात गुंतवणूक करण्याचे महत्त्व लक्षात आले आहे. जानेवारी ते मार्च हा नोकरीतील मूल्यमापनाचा काळ असतो. त्या काळात पदोन्नती, पगारवाढ होत असल्याने आर्थिक नियोजन आणि गुंतवणूक करण्याचा नागरिकांचा मानस असतो. त्यामुळे या काळात गुंतवणुक केल्यास आर्थिक पत वाढल्याने कर्ज फेडणे सोपे होते.

मंदीत बांधकाम क्षेत्राने तारले

घर घेण्यासाठी सगळेजण आपल्या संपूर्ण आयुष्यात एक योग्य संधी शोधत असतात. अशीच संधी सध्या उपलब्ध असून, गृहखरेदीधारकांनी या संधीचे सोने करून घ्यायला हवे. भविष्याचा विचार केला तर इतर कोणत्याही क्षेत्रातील गुंतवणुकीपेक्षा बांधकाम क्षेत्रातील गुंतवणूक हा एक सर्वसमावेशक व उत्कृष्ट पर्याय आहे, यावर अनेकांचे एकमत होईल. इतकेच नव्हे तर गुंतवणूकदाराला विक्रीबरोबरच मालमत्ता भाडेतत्त्वावर देण्यामधून देखील वेळोवेळी फायदा मिळविता येतो हे निश्चित. त्यामुळे अनेकवेळा आर्थिक मंदीच्या काळात देखील बांधकाम क्षेत्राने गुंतवणूकदाराला तारले आहे.

आत्तापर्यंतच्या सर्वांत कमी दरांमध्ये सध्या बांधकाम व्यावसायिक गृहप्रकल्पांची विक्री करीत आहेत. गृहकर्जावरील व्याजदरही कमी आहे. शिवाय व्याजाच्या रकमेवर देखील टॅक्स बेनिफिट मिळत आहेत. महिलेच्या नावावर घर खरेदी केल्यास मुद्रांक शुल्कात सवलत देण्यात येते. घरांची वाढती मागणी, मर्यादित पर्याय, सिमेंट आणि स्टीलच्या वाढत्या किमती यामुळे पुढील काही काळात बांधकाम क्षेत्रातील गुंतवणुकीच्या किमती या निश्चितपणे वाढणार आहेत. त्यामुळे सध्या कमी किमती असल्याने हाच काळ खरेदी व गुंतवणुकीसाठी योग्य आहे.

- अनिल फरांदे, अध्यक्ष, क्रेडाई पुणे मेट्रो

स्वतःच्या घराची निर्माण झालेली गरज आणि सर्वांत कमी व्याजदर या दोन महत्त्वाच्या बाबी सध्या घर खरेदी करण्याच्या निर्णयात महत्त्वाच्या ठरत आहेत. सध्या अल्पावधीत बँका गृहकर्ज मंजूर करीत आहेत. अचानक मागणी वाढल्याने न विकलेल्या घरांचा साठा संपला आहे. त्यामुळे बांधकाम सुरू असलेल्या घरांचे बुकिंग करण्यास प्रतिसाद वाढत आहे. या सर्व स्थितीचा विचार करता आता घर घेतले नाही, तर खरेदीदाराला कमी पर्याय शिल्लक राहतील. ज्यांना आपल्या मर्जीप्रमाणे घर हवे आहे त्यांनी लवकरात लवकर घर बुक करणे आवश्‍यक आहे.

- सुधीर गायकवाड, गुंतवणूक सल्लागार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com