Personal Loan Rates : 'या' बँकांमध्ये आहे सर्वात स्वस्त पर्सनल लोन; किती आहे व्याज दर?

पर्सनल लोन घेण्यासाठी तुम्हाला कोणतीही मालमत्ता गहाण ठेवण्याची गरज नाही.
Personal Loan Rates
Personal Loan Ratessakal

जर तुम्हाला पर्सनल लोन घ्यायचे असेल, तर तुम्ही 25 बँकांकडून परवडणाऱ्या व्याजदरात सहज लोन घेऊ शकता. सर्व बँका पर्सनल लोन वर वेगवेगळे व्याज आकारतात. पर्सनल लोन घेण्यासाठी तुम्हाला कोणतीही मालमत्ता गहाण ठेवण्याची गरज नाही. पर्सनल लोन देण्यापूर्वी बँका फक्त ग्राहकाचा क्रेडिट स्कोर तपासतात.

देशातील सर्वात मोठी बँक SBI देखील परवडणाऱ्या दरात पर्सनल लोन देत आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाचा वैयक्तिक कर्जाचा दर 9.60 टक्के आहे. ही बँक सध्या पर्सनल लोन वरील कमी व्याजासह मोफत प्रक्रिया सेवा देते​. ICICI बँक आणि HDFC बँकेचे दर 10.5 टक्क्यांपासून सुरू होतात.

हेही वाचा : किस्से बँकेच्या लाॅकररुममध्ये घडलेले...एका बँक अधिकाऱ्याच्याच तोंडून

  • यूनियन बैंक - 8.90%

  • फेडरल बैंक - 10.49%

  • सेंट्रल बैंक - 8.90%

  • आईडीएफसी बैंक - 10.49%

  • पंजाब नेशनल बैंक - 8.90%

  • एचडीएफसी बैंक - 10.50%

  • इंडियन बैंक - 9.05%

  • आईसीआईसीआई बैंक - 10.50%

  • बैंक ऑफ महाराष्ट्र - 8.45%

  • साउथ इंडियन बैंक - 10.55%

  • पंजाब एंड सिंध बैंक - 9.50%

  • आईओबी बैंक - 10.80%

  • आईडीबीआई बैंक - 9.50%

  • इंडसइंड बैंक - 11.00%

  • स्टेट बैंक ऑफ इंडिया - 9.60%

  • कनाडा बैंक - 11.25%

  • बैंक ऑफ बड़ौदा - 10.00%

  • धनलक्ष्मी बैंक - 11.90%

  • यूसीओ बैंक - 10.05%

  • एक्सिस बैंक - 12.00%

  • कोटक बैंक - 10.25%

  • कन्नूर बैंक - 12.00%

  • बीओआई बैंक - 10.35%

  • कर्नाटका बैंक - 12.45%

  • येस बैंक - 10.40%

युनियन बँकेकडून सर्वात स्वस्त पर्सनल लोन मिळते आहे. तुम्हाला 8.90 टक्के व्याजदराने लोन मिळते. जर तुम्हाला पाच वर्षांसाठी 5 लाख रुपये हवे असतील तर तुम्हाला या व्याजदरावर दरमहा फक्त 10,355 रुपये EMI भरावा लागेल. सेंट्रल बँके तुम्हाला 8.90 टक्के व्याजदराने पर्सनल लोन देते. या बँकेचा EMI दरमहा 10,355 रुपये आहे.

Personal Loan Rates
Pan Card : घरबसल्या अवघ्या काही तासांत मिळणार पॅनकार्ड; 'या' बँकेने सुरु केली सेवा

पंजाब नॅशनल बँकेचा पर्सनल लोनचा व्याजदर केवळ 8.90 टक्के आहे. या बँकेत तुम्हाला फक्त 10,355 रुपये प्रति महिना EMI भरावा लागेल. सध्या काही बँका परवडणाऱ्या दरात पर्सनल लोन देत आहेत. इंडियन बँके पर्सनल लोन ऑफरमधील व्याजदर 9.05 टक्क्यांपासून सुरू होतात. बँक ऑफ महाराष्ट्र सर्वात कमी 9.45 टक्के दराने पर्सनल लोन देत आहे आणि पंजाब आणि सिंध बँक आणि IDBI बँक 9.50 टक्के दराने लोन देते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com