महंगाई डायन खाये जात है! 37 दिवसांत 21 वेळा वाढलं पेट्रोल-डिझेल

महंगाई डायन खाये जात है! 37 दिवसांत 21 वेळा वाढलं पेट्रोल-डिझेल

मंगळवारी पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर होते. मात्र, बुधवारी पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा भडका उडाला असून किंमती सर्वोच्च स्तरावर पोहचल्या आहेत. बुधवारी देशातीतील चार महानगरांमध्ये पेट्रोल प्रति लीटर 25 पैशांनी तर डिझेल प्रति लीटर 27 पैशांनी वाढलं आहे. इंडियन ऑयल कॉर्पोरेशननुसार, राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोल आणि डिझेल बुधवारी प्रति लीटर 25 पैशांनी महागलं आहे. दिल्लीमध्ये पेट्रोल आणि डिझेल प्रति लीटर क्रमश: 95.56 रुपये आणि 86.47 रुपये झालं आहे.

4 मे 2021 पासून आतापर्यंत 37 दिवसांपैकी तब्बल 21 दिवस पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत. उर्वरित 16 दिवस किंमती स्थिर राहिल्या आहेत. राजधानी दिल्लीमध्ये 21 दिवसांत पेट्रोल प्रति लीटर 5.16 रुपये तर डिझेल प्रति लीटर 5.74 रुपयांनी महागलं आहे.

महंगाई डायन खाये जात है! 37 दिवसांत 21 वेळा वाढलं पेट्रोल-डिझेल
मुंबई-दिल्लीमध्ये तिसरी लाट नाही, तज्ज्ञांनी सांगितलं कारण

मुंबईमध्ये पेट्रोल प्रति लीटर 24 पैशांनी वाढून 101.76 रुपये, चेन्नईमध्ये 23 पैशांनी वाढून 96.94 रुपये आणि कोलकातामध्ये 24 पैशांनी वाढून 95.52 रुपये प्रति लीटर झालं आहे. डिझेल मुंबईमध्ये 27 पैसे, चेन्नई 23 पैसे आणि कोलकातामध्ये 25 पैसे प्रति लीटर महागलं आहे. डिझल प्रति लीटर मुंबईमध्ये 93.85 रुपये, कोलकातामध्ये 89.32 रुपये आणि चेन्नईमध्ये 91.15 रुपये झालं आहे.

महंगाई डायन खाये जात है! 37 दिवसांत 21 वेळा वाढलं पेट्रोल-डिझेल
कोरोनाचा नवा व्हेरियंट सापडला, लागण झाल्यास गंभीर धोका

आपल्या शहरात काय आहेत भाव? (How to check petrol-diesel price)
पेट्रोल-डिझेलच्या किंमती (Petrol-Diesel Price) आपण SMS च्या द्वारे देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑईलच्या वेबसाईटनुसार, आपल्याला RSP आणि आपल्या शहराचा कोड लिहून 9224992249 नंबर वर SMS पाठवायचा आहे. प्रत्येक शहराचा कोड वेगवेगळा आहे. हा कोड आपल्याला IOCL च्या वेबसाईटवरुन मिळेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com