esakal | 32 चं पेट्रोल 100 रुपयांना मिळतं, जाणून घ्या केंद्र आणि राज्य सरकारच्या वाट्याचं गणित
sakal

बोलून बातमी शोधा

petrol diesel

ग्राहकांपर्यंत पेट्रोल 90 ते 100 रुपयांपर्यंत पोहोचत असलं तरी प्रत्यक्षात मात्र या पेट्रोलचा निर्मिती खर्च 30 ते 35 रुपये इतकाच आहे. 

32 चं पेट्रोल 100 रुपयांना मिळतं, जाणून घ्या केंद्र आणि राज्य सरकारच्या वाट्याचं गणित

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली - देशभरात पेट्रोलच्या किंमती भडकल्या आहेत. अनेक ठिकाणी प्रिमियम पेट्रोलचे दर 100 रुपयांच्यावर गेले आहेत. ग्राहकांपर्यंत पेट्रोल 90 ते 100 रुपयांपर्यंत पोहोचत असलं तरी प्रत्यक्षात मात्र या पेट्रोलचा निर्मिती खर्च 30 ते 35 रुपये इतकाच आहे. पेट्रोल तयार झाल्यापासून ते पेट्रोल पंपावर उपलब्ध होईपर्यंत त्यावर वेगवेगळे कर लागतात. त्यामुळेच कच्च्या तेलाचे दर जरी कमी असले तरी पेट्रोल महाग मिळतं. यामध्ये केंद्र सरकारचा आणि राज्य सरकारचा वाटा वेगवेगळा असतो. 

समजा एक लिटर पेट्रोलचा दर 100 रुपये असेल तर त्यापैकी जवळपास 64 टक्के कर असतो. यात केंद्राचे आय़ात शुल्क आणि राज्य सरकारने लागू केलेला व्हॅट यांचा समावेश असतो. 100 रुपयांच्या पेट्रोलवरचा 64 टक्के कर वजा केला तर पेट्रोलची किंमत होते 36 रुपये. यातही कच्च्या तेलाच्या किंमती, प्रक्रिया, डिलर्स यांचा वाटा असतो. इंधनावर लावण्यात येणाऱ्या 64 टक्क्यांची विभागणी केंद्र आणि राज्य सरकारची वेगवेगळी असते. राज्य सरकारचा व्हॅट 24 टक्के तर केंद्र सरकार 40 टक्के कर आकारते. ग्राहकांना जे पेट्रोल मिळतं त्याच्या किंमतीपैकी 64 टक्के हा कर असतो. 

हे वाचा - पवित्र संदूक वाचवण्यासाठी धावले, 800 भाविकांचा मृत्यू

याव्यतिरिक्त 100 रुपयांमध्ये 4 ते साडेचार टक्के डिलर्सची कमाई असते. राज्य, केंद्र सरकार यांचा कर, डिलर्सची कमाई हे वजा केल्यांतर उरते ती पेट्रोल निर्मितीची किंमत. एक लिटर पेट्रोल 100 रुपयांना असेल तर वरचे सर्व कर आणि डिलर्सची कमाई वगळली तर 32 रुपये इतकी किंमत होते. यामध्ये कच्च्या तेलावर प्रोसेस करण्यासाठी प्रतिलिटरमागे चार रुपये इतका खर्च येतो. कच्चं तेल रिफाइन केल्यानंतर ते पेट्रोल म्हणून वापरलं जातं. प्रोसेस करण्याआधी याच कच्च्या तेलाची किंमत 28 रुपये इतकी असते. तुम्ही जर 100 रुपयांचं पेट्रोल भरत असाल तर त्या पेट्रोलची मूळ किंमत ही 32 रुपये इतकीच असते.

गेल्या आठवड्यात पेट्रोलचा दर हा 89 रुपये इतका होता. तेव्हा प्रत्यक्षात किती रुपये कर आणि इतर खर्च किती होता ते आपण पाहू.

कर किती आणि कोणता (89.29 रुपये दर असताना)

  • मूळ किंमत (1 लीटर पेट्रोलचा एक्‍स फॅक्‍टरी दर) 31.82 रूपये
  • वाहतूक खर्च - 0.28 पैसे
  • उत्पादन शुल्क - 32. 90 रू .
  • डीलरचे कमिशन - 3. 68 रू.
  • मूल्यवर्धीत कर (व्हॅट) - 20.61 रू.
  • तुमच्याकडून घेतले जाणारे पैसे - 89.29 रू. 

हे वाचा -- देशात कोरोनाची आकडेवारी देतेय धोक्याचा इशारा; महाराष्ट्र, केरळमध्ये चिंतेची बाब

देशात डिझेलचे दर 83 ते 90 रुपये लिटर इतके आहेत. वाहनांचे इंधन इतके महाग असताना विमानांचे इंधन मात्र त्या तुलनेत खूपच स्वस्त आहे. विमानाच्या एक लिटर इंधनाचा दर साधारणत: 55 ते 60 रुपयांच्या आसपास आहे. याचे कारण म्हणजे विमानांच्या इंधनावर केंद्र सरकार खूप कमी कर आकारते. पेट्रोल डिझेलवर लागू असलेला सेस एटीएफवर आकारला जात नाही. यामुळे दरामध्ये इतका फरक पडतो.

loading image