आनंदाची बातमी, पाच रुपयांनी स्वस्त होऊ शकते पेट्रोल-डिझेल

ईशान्य भारतातील पेट्रोल पंपांची तपासणी
ईशान्य भारतातील पेट्रोल पंपांची तपासणी

Petrol-Diesel price update: पेट्रोल - डिझेल (Petrol-Diesel) च्या वाढत्या किमतींनी सामान्य माणसांच्या डोक्याला ताप दिला आहे. पेट्रोलच्या किंमती 100 रुपयांच्या पार गेल्याने लोकांचे हाल होत आहेत. त्यामुळेच या किमती कमी व्हाव्यात अशी आशा सर्वसामान्य बाळगून आहेत. दुरिकडे चीनमधील कमजोर आर्थिक वाढ, कोरोना व्हायरस आणि ओपेक+ च्या उत्पादनातील वाढिमुळे कच्च्या तेलाच्या किंमती (Crude Oil Price) कमी झाल्यात. याचा थेट फायदा स्थानिक बाजारांतही बघायला मिळेल. त्यामुळेच येत्या काळात पेट्रोल - डिझेलच्या किंमती 5 रुपयांनी स्वस्त होऊ शकतात असा अंदाज वर्तवण्यात येतो आहे.

WTI, ब्रेंच क्रूडमध्ये घट

MCX वर ऑगस्टसाठी कच्च्या तेलाची डिलिव्हरी 73 डॉलर्स किंवा 1.32 टक्के घसरुन 5,444 रुपये प्रति बॅरल झाले आहे. सप्टेंबरच्या डिलिव्हरी 307 लॉटसोबत 69 डॉलर्स किंवा 1.26 टक्के घसरुन 5,415 रुपये प्रति बॅरल झाले आहे. WTI क्रूड 1.18 टक्के घसरुन 73.08 डॉलर प्रति बॅरल झाले आहे. तर आंतरराष्ट्रीय बेंचमार्क ब्रेंट क्रूड 0.99 टक्क्यांनी घसरून 74.66 डॉलर प्रति बॅरल झाले आहे. कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये झालेल्या घटीचा फायदा स्थानिक बाजारातील पेट्रोल - डिझेलच्या किंमतींवर होईल असा अंदाज तज्ज्ञांकडून वर्तवला जात आहे.

ईशान्य भारतातील पेट्रोल पंपांची तपासणी
सोनं गाठणार प्रति तोळा एक लाखांचा टप्पा; कधी ते जाणून घ्या?

एक्सपर्ट्सचे क्रूडबाबत मत

देशातील दूसऱ्या सगळ्यात मोठ्या तेल उपभोक्ता कारखान्यातील उपक्रमात घट झाल्याने तसेच चीनच्या आर्थिक सुधारणेबाबत असणाऱ्या साशंकतेमुळे कच्चा तेलाच्या किंमतीत घट झालीय. अमेरिका आणि चीनसोबत जगातील इतर देशात कोरोनाचे प्रमाण वाढतेय. त्याचाही मोठा प्रभाव तेलाच्या किमतींवर झालाय अशी माहिती HDFC सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल यांनी दिली. तर क्रूड ऑईलचे उत्पादन वाढल्याने येत्या काळात कच्चे तेल 65 डॉलर प्रति बॅरलपर्यंत येऊ शकतात अशी माहिती IIFL सिक्युरिटीजचे व्हाइस प्रेसिडेंट (कमोडिटी अँड रिसर्च) अनुज गुप्ता यांनी दिली.

ईशान्य भारतातील पेट्रोल पंपांची तपासणी
कोरोनामुळे मृत्यू, इन्शुरन्समधून मिळालेले एक कोटी विठ्ठल चरणी

पेट्रोल-डिझेलच्या मागणीत वाढ

जुलैमध्ये देशात पेट्रोल विक्रीने 2020 मध्ये लॉकडाउननंतर पहिल्यांदाच प्री-कोविड स्तर पार केला. कोविड-19 च्या दुसऱ्या लाटेनंतर लॉकडाउनमध्ये सूट दिल्याने व्यवसायात तेजी आली तसेच ट्रॅव्हल बंदी हटवल्याने पेट्रोलचा खप वाढल्याची माहिती सरकारी तेल कंपन्यांच्या प्रोव्हीजनल डेटामधून समोर आली. येत्या काळात पेट्रोल डिझेलच्या किंमती कमी झाल्यास व्यवसायात आणखी वाढ होईल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com