Petrol-Diesel: तेल कंपन्यांनी जाहीर केले डिझेल आणि पेट्रोलचे दर, जाणून घ्या आजची किंमत

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती स्थिर असल्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.
Petrol-Diesel
Petrol-Diesel sakal

Petrol-Diesel Price Today: पेट्रोल डिझेलच्या किंमतींनी ऐतिहासिक उच्चांक गाठला आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कोणतीही वाढ केलेली नाही. आजही पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती स्थिर आहेत, त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. राजधानी दिल्लीत एक लिटर पेट्रोलचा दर 105.41 रुपये तर प्रति लिटर डिझेलचा दर 96.67 रुपये आहे. मुंबईत पेट्रोलचा दर 120.51 रुपये आणि डिझेलचा दर 104.77 रुपये प्रतिलिटर आहे.

कोलकात्यात पेट्रोलची किंमत 115.12 रुपये आहे, तर डिझेलची किंमत 99.83 रुपये प्रति लीटर आहे. त्याच वेळी, चेन्नईमध्ये पेट्रोल 110.85 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 100.94 रुपये प्रति लिटर आहे. गेल्या वर्षी ४ नोव्हेंबरपासून या दोन्ही इंधनांच्या किमतीत कोणतीही वाढ झालेली नाही.

Petrol-Diesel
Petrol Diesel Price: पेट्रोल-डिझेलचे दर वाढले? जाणून घ्या आजची किंमत

प्रमुख महानगरांमध्ये किंमत किती आहे ते जाणून घ्या

शहरातील डिझेल पेट्रोल

दिल्ली- 96.67/ 105.41

मुंबई- 104.77/ 120.51

कोलकाता- 99.83/ 115.12

चेन्नई- 100.94/ 110.85

Petrol-Diesel
Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर; जाणून घ्या तुमच्या शहरातील किंमत

या राज्यांमध्ये पेट्रोलचा दर १०० रुपयांच्या पुढे गेला आहे-

मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, ओडिशा, जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये पेट्रोलची किंमत 100 रुपयांच्या वर आहे. मुंबईत पेट्रोलचे दर सर्वाधिक आहेत.

अशा प्रकारे घरबसल्या तेलाच्या किंमती तपासा-

या वेबसाइटवर क्लिक करा https://iocl.com/petrol-diesel-price किंवा Google च्या प्ले स्टोअरवरून IOC चे अ‍ॅप डाउनलोड करा. तसेच 9224992249 वर एसएमएस करा. यासाठी RSP-स्पेस-पेट्रोल पंप डीलरचा कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल. अशा पद्धतीने तुम्ही पेट्रोल डिझेलच्या किमती तपासू शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com