Petrol-Diesel Price: सलग 17 व्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर; जाणून घ्या तुमच्या शहरातील किंमत

आज सलग 17 व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाहन इंधन पेट्रोल आणि डिझेलच्या किमती देशभरात स्थिर आहेत.
petrol diesel price updates
petrol diesel price updatesSakal
Updated on

Petrol-Diesel Price Today: राष्ट्रीय बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये 07 एप्रिलपासून कोणताही बदल झालेला नाही.आज सलग 17 व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाहन इंधन पेट्रोल आणि डिझेलच्या किमती देशभरात स्थिर आहेत. इंडियन पेट्रोलियम मार्केटिंग कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) च्या ताज्या अपडेटनुसार, देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोल 105.41 रुपये प्रति लिटरवर स्थिर आहे, तर मुंबईत पेट्रोल 120.51 रुपये प्रति लिटरवर विकले जात आहे.

petrol diesel price updates
Petrol-Diesel Prices: तेल कंपन्यांनी जाहीर केले पेट्रोल-डिझेलचे दर; पाहा आजचे दर

त्याच वेळी, दिल्लीत डिझेल 96.67 रुपये प्रति लिटर आणि मुंबईत 104.77 रुपये प्रति लीटर आहे. कोलकातामध्ये एक लिटर पेट्रोल 115.12 रुपयांना विकले जात आहे, तर डिझेलची किंमत 99.83 रुपये प्रति लीटर आहे. याशिवाय चेन्नईमध्ये पेट्रोल 110.85 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 100.94 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.

22 मार्च ते 6 एप्रिलपर्यंत भारतात पेट्रोल आणि डिझेल प्रति लिटर 10 रुपयांनी महागले आहे. तर ७ एप्रिलपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. मात्र, राज्यस्तरावर वाहनांच्या इंधनावरील व्हॅटचे दर वेगवेगळे असल्याने शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलतात.

petrol diesel price updates
Petrol Diesel Price: पेट्रोल-डिझेलचे दर उच्चांकी पातळीवर; जाणून घ्या आजची किंमत

या राज्यांमध्ये पेट्रोलचा दर १०० रुपयांच्या पुढे-

मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, ओडिशा, जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये पेट्रोलची किंमत 100 रुपयांच्या वर आहे. मुंबईत पेट्रोलचे दर सर्वाधिक आहेत.

अशा प्रकारे घरबसल्या तेलाच्या किंमती तपासा-

या वेबसाइटवर क्लिक करा https://iocl.com/petrol-diesel-price किंवा Google च्या प्ले स्टोअरवरून IOC चे अ‍ॅप डाउनलोड करा. तसेच 9224992249 वर एसएमएस करा. यासाठी RSP-स्पेस-पेट्रोल पंप डीलरचा कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल. अशा पद्धतीने तुम्ही पेट्रोल डिझेलच्या किमती तपासू शकता

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.