
भारतीय तेल कंपन्यांनी आज नेहमीप्रमाणं पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जाहीर केले आहेत.
Petrol-Price Today : पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये दिलासा; देशात आजचे दर काय?
Petrol-Diesel Price Today : भारतीय तेल कंपन्यांनी (Indian oil companies) आज (4 जुलै, सोमवार) नेहमीप्रमाणं सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे (Petrol-Diesel) नवीन दर जाहीर केले आहेत. आजही तेलाच्या दरात कोणताही बदल झालेला नाहीय. देशाची राजधानी दिल्लीत एक लिटर पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपयांना विकलं जात आहे.
देशाची आर्थिक राजधानी मुंबईत (Mumbai) पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. तिथं एक लिटर पेट्रोल 111.35 रुपये आणि डिझेल 97.28 रुपयांना विकलं जात आहे. पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता इथं पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर दरानं विकलं जात आहे. त्याच वेळी, चेन्नईबद्दल बोलायचं झालं तर, पेट्रोलची किंमत 102.63 रुपये आहे, तर डिझेल 94.24 रुपयांना विकलं जात आहे.
देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये बराच काळ बदल झालेला नसल्याची माहिती आहे. अशा परिस्थितीत जनतेला दिलासा मिळत आहे. केंद्र सरकारनं 21 मे रोजी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केलं. त्यामुळं देशभरात कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्या आहेत. दरम्यान, उत्पादन शुल्कात कपात करण्यापूर्वी देशभरात पेट्रोल-डिझेलच्या किमती विक्रमी पातळीवर होत्या. मार्च-एप्रिलमध्ये युक्रेन-रशिया तणावाच्या काळात वाहनांच्या इंधनावर सतत भाववाढ होत होती, त्यामुळं लोक नाराज झाले होते.
महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर
शहर पेट्रोल डिझेल
दिल्ली 96.72 89.62
मुंबई 111.35 97.28
चेन्नई 102.63 94.24
कोलकाता 106.03 92.76
हेही वाचा: प्रेयसीसोबत लॉजवर असताना तरूणाचा मृत्यू, खिशात सापडलं स्टॅमिना वाढवणाऱ्या गोळ्यांचं पाकीट
प्रमुख शहरांमध्ये इंधनाच्या किमती जाणून घ्या
भोपाळमध्ये पेट्रोल 108.65 रुपये आणि डिझेल 93.90 रुपये आहे.
अहमदाबादमध्ये पेट्रोल 96.42 रुपये आणि डिझेल 92.17 रुपयांना विकलं जात आहे.
अजमेरमध्ये पेट्रोल 108.85 रुपये, डिझेल 94.06 रुपये आहे.
रांचीमध्ये पेट्रोल 99.84 रुपये, डिझेल 94.65 रुपयांना विकलं जात आहे.
श्रीगंगानगरमध्ये पेट्रोल 113.65 रुपये, डिझेल 98.39 रुपये आहे.
हेही वाचा: एचडीएफसी आणि HDFC बँकेच्या विलीनीकरणास मान्यता, काय होणार परिणाम?
तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलची किंमत SMS द्वारे तपासा
तुमच्या फोनवरून एसएमएसद्वारे तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज जाणून घेऊ शकता. यासाठी इंडियन ऑइलच्या (IOCL) ग्राहकांना RSP कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर पाठवावा लागेल.
Web Title: Petrol Diesel Price Today July 04 No Changes Fuel Prices Stable Check Iocl Rates Delhi Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..