कच्च्या तेलाच्या किंमती गगनाला भिडल्या; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर

शुक्रवारी सकाळी जाहीर झालेल्या किमतींनुसार आजही तेलाचे दर स्थिर आहेत.
petrol
petrolSakal

Petrol-Diesel Price Today: रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून युद्ध सुरू आहे. मात्र भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. शुक्रवारी सकाळी जाहीर झालेल्या किमतींनुसार आजही तेलाचे दर स्थिर आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून सर्व महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर बदललेले नाहीत. दोन्ही देशांमधील युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमती विक्रमी पातळीवर पोहोचल्या असल्या तरी त्याचा भारतातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींवर सध्या तरी कोणताही परिणाम झालेला नाही.

petrol
Petrol Diesel Prices : पेट्रोल-डिझेलचे आजचे दर काय? जाणून घ्या

IOCL नुसार, राजधानी दिल्लीमध्ये आज एक लिटर पेट्रोलची किंमत 95.41 रुपये आहे, तर डिझेल 86.67 रुपयांना विकले जात आहे. आर्थिक राजधानी मुंबईबद्दल बोलायचे झाले तर येथे एक लिटर पेट्रोल 109.98 रुपयांना मिळत आहे तर त्याचवेळी डिझेल 94.14 रुपयांना विकले जात आहे. याशिवाय कोलकाता, पश्चिम बंगालमध्ये पेट्रोल 104.67 रुपये आणि डिझेल 89.79 रुपयांना विकले जात आहे. त्याचवेळी, चेन्नईमध्येही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. येथे एक लिटर पेट्रोल 101.40 रुपयांना आणि डिझेल 91.43 रुपयांना मिळत आहे.

petrol
पेट्रोलचे दर जैसे थे! जाणून घ्या Petrol Diesel च्या किंमती

आजचे पेट्रोल-डिझेलचे दर: महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर जाणून घेऊया

शहराचे नाव पेट्रोल डिझेल

दिल्ली 95.41 / 86.37

मुंबई 109.98 / 94.14

कोलकाता 104.67 / 89.79

चेन्नई 101.40 / 91.43

कच्च्या तेलाच्या किमती विक्रमी उच्चांकावर-

रशिया आणि युक्रेन युद्धादरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती विक्रमी पातळीवर पोहोचल्या आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल १०० डॉलरच्या पुढे जात होती, तर बुधवारी त्याची किंमत प्रति बॅरल ११० डॉलरवर पोहोचली होती. गेल्या सात वर्षांतील ही सर्वोच्च किंमत आहे. पाच राज्यांमध्ये सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकांनंतर भारतातही पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढू शकतात, असे मानले जात आहे.

अशा प्रकारे घरबसल्या तेलाच्या किंमती तपासा

या वेबसाइटवर क्लिक करा https://iocl.com/petrol-diesel-price किंवा Google च्या प्ले स्टोअरवरून IOCL चे अॅप डाउनलोड करा. तसेच 9224992249 वर एसएमएस करा. यासाठी RSP-स्पेस-पेट्रोल पंप डीलरचा कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com