Petrol Diesel : विमानाच्या इंधनाचे दर कमी, पेट्रोल-डिझेलही होणार स्वस्त? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Petrol Diesel Prices

इंधनाचे दर प्रचंड वाढत असताना विविध राज्यातील सरकारकडून कर कपात केली जात आहे.

Petrol Diesel : विमानाच्या इंधनाचे दर कमी, पेट्रोल-डिझेलही होणार स्वस्त?

Petrol Diesel Prices : इंधन दरात वाढ झाल्यानं अलीकडच्या काळात सर्वत्र प्रवास भाडे वाढले होते. हवाई वाहतुकीलाही याचा फटका बसला. परंतु, कच्च्या तेलाच्या (Crude oil) दरात घसरण झाल्यानं तेल कंपन्यांनी हवाई इंधन दरात (Air Turbine Fuel) कपात केल्यानं ते आता 2.2 टक्क्यांनी स्वस्त झालं आहे. परिणामी, विमान प्रवास स्वस्त होऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

इंधनाचे दर प्रचंड वाढत असताना विविध राज्यातील सरकारकडून कर कपात (Tax Deduction) केली जात आहे. अशा स्थितीत तेल कंपन्यांकडूनही (Oil Companies) एटीएफमध्ये कपात केली गेल्यानं विमान प्रवाशांना दिलासा देणारी बातमी मिळू शकते. तर, दुसरीकडं कच्च्या तेलाचा भाव अनेक दिवसांपासून 100 डॉलरच्या जवळ आहे. गेल्या आठवडाभरापासून त्याचे दरही कमी होताना दिसत आहेत. अशा स्थितीत पेट्रोल आणि डिझेलच्या दरातही (Petrol Diesel Rates) घट होण्याची शक्यता आहे. तज्ञांचं म्हणणं आहे की, जर कच्चं तेल 100 च्या जवळ राहिलं तर किमती कमी होण्याची शक्यता कमी आहे.

हेही वाचा: हीच ती वेळ! जनता अजूनही आपल्याकडंच आशेनं पाहतेय: आदित्य ठाकरे

कच्च्या तेलाच्या सततच्या घसरणीच्या पार्श्वभूमीवर, सरकारी मालकीच्या तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे किरकोळ दरही जाहीर केले आहेत. यामध्ये आज (रविवार) कोणताही बदल करण्यात आलेला नाहीय. दिल्लीत अजूनही पेट्रोल 96.72 रुपये प्रतिलिटर मिळत आहे. 6 एप्रिलपासून कंपन्यांनी त्याच्या किमती वाढवल्या नाहीयत. त्यामुळं आगामी काळात पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर राहण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: PM मोदींनी 296 किमी लांबीच्या Bundelkhand Expressway चं केलं उद्घाटन

महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

  • दिल्ली : पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

  • मुंबई : पेट्रोल 109.27 रुपये आणि डिझेल 95.84 रुपये प्रति लिटर

  • चेन्नई : पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

  • कोलकाता : पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

हेही वाचा: Indonesia : इंडोनेशियात दहशतवाद्यांचा भ्याड हल्ला; हल्ल्यात 10 जण जागीच ठार

'या' शहरांमध्ये नवीन भाव सुरू

  • नोएडा : पेट्रोल 96.79 रुपये आणि डिझेल 89.96 रुपये प्रति लिटर झाले आहे.

  • लखनौ : पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.76 रुपये प्रति लिटर झाले आहे.

  • पाटणा : पेट्रोल 107.24 रुपये आणि डिझेल 94.04 रुपये प्रति लिटर झाले आहे.

Web Title: Petrol Diesel Prices Aircraft Fuel Rates Reduced Will Petrol Diesel Also Be Cheaper Oil Companies

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..