हीच ती वेळ! जनता अजूनही आपल्याकडंच आशेनं पाहतेय: आदित्य ठाकरे

शिवसेनेतील 40 आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे यांनी बंड केलंय.
Aditya Thackeray
Aditya Thackerayesakal
Summary

शिवसेनेतील 40 आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे यांनी बंड केलंय.

देशभरात मुसळधार पावसामुळं (Heavy Rain In Maharashtra) अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालंय. अनेक जिल्ह्यांमध्ये पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झालीय. अनेक भागांमध्ये पाणी साचलंय. मुसळधार पावसामुळं रस्ते पाण्याखाली जाऊन अनेक गावांचा संपर्क तुटलाय. भूस्खलन (Landslide) तसेच वीज पडल्याने अनेकांचा मृत्यू झालाय. महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळं राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी 1 जूनपासून आतापर्यंत 102 लोकांचा बळी गेला आहे. याच पार्श्वभूमीवर माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी शिवसैनिकांना (Shiv Sena) पूरस्थितीबाबत आवाहन केलंय.

आदित्य ठाकरे यांनी ट्विटमध्ये युवासैनिकांना आवाहन करताना लिहिलंय, आताच्या राजकीय परिस्थितीकडं लक्ष न देता, जिथं-जिथं पूर परिस्थिती निर्माण झाली आहे, अशा भागांत शक्य असेल ती मदत पोहोचवा, मदत कार्य करा, असं त्यांनी आवाहन केलंय. सर्व सामान्य जनता अजूनही आपल्याकडंच आशेनं पाहत आहे. जनतेचा विश्वास सार्थ ठरविण्याची 'हीच ती वेळ' आहे, असंही त्यांनी म्हटलंय.

Aditya Thackeray
मोदी-शाह पुन्हा धक्कातंत्र वापरणार; आज उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराची करणार घोषणा!

शिवसेनेतील 40 आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केलं. या बंडानं शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार केलं आणि एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं. त्यामुळं या बंडामुळं महाराष्ट्रासह देशातील राजकारणात खळबळ उडाली. या बंडामुळं शिवसेनेचंही मोठं नुकसान झालंय. मात्र, उद्धव ठाकरेंसोबत (Uddhav Thackeray) आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेला पुन्हा नव्याने ऊर्जा देण्यासाठी जिल्हा निहाय दौरा सुरु केलाय. सध्या महाराष्ट्रात मुसळधार पाऊस सुरु असून अनेक जिल्ह्यांना याचा मोठा फटका बसलाय. याच अनुषंगानं आदित्य ठाकरेंनी युवासैनिकांना आवाहन केलंय.

Aditya Thackeray
महात्मा गांधींवरील वादग्रस्त विधान भोवलं, यती नरसिंहानंदांवर गुन्हा दाखल

पावसामुळं 183 जनावरांचा मृत्यू

राज्यात पावसाचा फटका माणसांसह जनावरांनाही बसलाय. अनेक जनावरांना पावसामुळं जीव गमवावा लागलाय. आतापर्यंत मुसळधार पावसामुळं सुमारे 183 जनावरांचा मृत्यू झाला असून हा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पूरजन्य परिस्थिती पाहता राज्यात विविध भागांमध्ये एनडीआरएफ (NDRF) आणि एसडीआरएफ (SDRF) पथकं तैनात करण्यात आली आहेत. 14 एनडीआरएफ आणि 5 एसडीआरएफ पथकांकडून बचावकार्य सुरु आहे. आतापर्यंत 11 हजार 836 जणांना पूरातून सुखरुप बाहेर काढण्यात आलंय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com