esakal | Petrol- Diesel prices: पेट्रोल- डिझेलच्या दरात पुन्हा वाढ; बघा आजच्या किंमती
sakal

बोलून बातमी शोधा

petrol prices

सरकारी तेल कंपन्यांकडून आजही डिझेल आणि पेट्रोलच्या किंमतीत बदल झाला आहे.

Petrol- Diesel prices: पेट्रोल- डिझेलच्या दरात पुन्हा वाढ; बघा आजच्या किंमती

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

नवी दिल्ली: सरकारी तेल कंपन्यांकडून आजही डिझेल आणि पेट्रोलच्या किंमतीत बदल झाला आहे. डिझेलच्या दरात 18 ते 20 पैशांनी तर पेट्रोलच्या दरात 8 पैशांची वाढ झाली आहे. यापुर्वी शुक्रवारी तब्बल 50 दिवसांनंतर पेट्रोलच्या दरात वाढ झाली होती.

जाणून घ्या प्रमुख शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर-
Indian Oil Corporation च्या माहितीनुसार आज दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नईमध्ये प्रति लिटर पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. 

शहर डिझेल  पेट्रोल
दिल्ली  71.07  81.46
कोलकाता  74.64 83.03
मुंबई    77.54 88.16
चेन्नई  76.55 84.53

( पेट्रोल- डिझेलचे दर प्रतिलिटरचे आहेत)

NEFT नंतर आता RTGS च्या नियमातही बदल; नवी सुविधा फायद्याची

तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलच्या कशा माहित कर जाणून घ्या-
आता पेट्रोल-डिझेलची किंमत एसएमएसच्या माध्यमातूनही तुम्हाला कळू शकते. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार, तुम्हाला RSP आणि तुमचा सिटी कोड 9224992249 या क्रमांकावर पाठवावा लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलच्या किंमती कळतील प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे.

हेल्मेट न वापरल्यास ड्रायव्हिंग लायसन्स होणार रद्द

दररोज सहा वाजता किंमती बदलतात-
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती दररोज सकाळी सहा वाजता बदलतात. नवे दर सकाळी सहा वाजल्यापासून लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टींची भर घातल्यानंतर किंमत जवळजवळ दुप्पट होत असतात. परकीय चलन दरांसह आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमती काय आहेत याच्या आधारावर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती दररोज बदलतात.

loading image