Petrol Diesel Prices : निवडणुकीत चर्चा पेट्रोल-डिझेलच्या दरावर

जाणून घ्या तुमच्या शहरातील आजच्या पेट्रोल-डिझेलच्या किंमती
Check Today's Petrol Diesel Price Updates
Check Today's Petrol Diesel Price Updatesesakal
Summary

जाणून घ्या तुमच्या शहरातील आजच्या पेट्रोल-डिझेलच्या किंमती

सध्या देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका सुरू आहेत. निवडणुकीत पेट्रोल-डिझेलच्या दरांची (Petrol Diesel Prices) जोरदार चर्चा सुरू आहे. काही माध्यमांच्या वृत्तांच्या आधारे निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी वाढ होऊ शकते, असे वृत्त प्रसिद्ध झाले होते. यानंतर चर्चेला उधाण आले आहे. (Check Today's Petrol Diesel Price Updates)

Check Today's Petrol Diesel Price Updates
Petrol-Diesel Price : महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलचे आजचे दर काय?

या सर्वांमध्येच आईओसीएलने (IOCL) रविवारी देशात पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत. सात वर्षांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात विक्रमी पातळीवर सुरू असलेल्या कच्च्या तेलाच्या किमतीत आज कोणताही बदल झालेला नाही. गेल्या तीन महिन्यांपासून देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढत असूनही सरकारी तेल कंपन्यांना निवडणुकीच्या दबावामुळे भाववाढ करता आलेली नाही. असे असूनही मुंबईत पेट्रोलचे दर अजूनही सर्वाधिक म्हणजे 110 रुपयांच्या आसपास आहेत. मेट्रो शहरे वगळता छोट्या शहरांमध्ये कंपन्या सतत आपल्या किंमती बदलत असतात.

राष्ट्रीय राजधानी दिल्लीत (Delhi) आज पेट्रोल (Petrol) 95.41 रुपये प्रति लिटर आणि डिझेल (Diesel) 86.67 रुपये प्रति लिटरवर स्थिर आहे. मुंबईत (Mumbai) आज पेट्रोल (Petrol) 109.98 रुपये प्रति लिटर आणि डिझेल (Diesel) 94.14 रुपये प्रति लिटरवर स्थिर आहे. पुण्यात (Pune) आज पेट्रोल (Petrol) 109.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेल (Diesel) 92.50 रुपये प्रति लिटरवर स्थिर आहे. पेट्रोलची सर्वाधिक किंमत परभणीमध्ये असून प्रति लिटर 112 रुपयांनी पेट्रोल विकण्यात येत आहे.

Check Today's Petrol Diesel Price Updates
पेट्रोल भरण्याआधी जाणून घ्या काय आहे आजचा भाव

जाणून घ्या तुमच्या शहरातील आजच्या पेट्रोल-डिझेलच्या किंमती

शहराचे नाव... पेट्रोल ... डिझेल

- दिल्ली- 95.41- 86.67 रुपये

- मुंबई-109.98- 94.14 रुपये

- पुणे- 109.72- 92.50 रुपये

- नाशिक- 109.79-92.57 रुपये

- रत्नागिरी- 110.97-93.68 रुपये

- वाशिम- 110.71-93.49 रुपये

- अहमदनगर- 110.12-92.90 रुपये

- रायगड- 109.48- 92.25 रुपये

- सोलापूर- 110.57-93.34 रुपये

- सांगली- 110.03-92.83 रुपये

- अमरावती- 111.14- 93.90 रुपये

- गडचिरोली- 110.53-93.32 रुपये

-परभणी- 112.49-95.17 रुपये

- पालघर- 109.75-92.51 रुपये

- कोल्हापूर- 110.09-92.89 रुपये

- औरंगाबाद- 110.38-93.14 रुपये

- नागपूर- 110.10-92.90 रुपये

- सातारा- 110.03-93.88 रुपये

- सांगली-109.65-92.83 रुपये

अशा प्रकारे घरबसल्या तेलाच्या किंमती तपासा

या वेबसाइटवर क्लिक करा https://iocl.com/petrol-diesel-price किंवा Google च्या प्ले स्टोअरवरून IOC चे अॅप डाउनलोड करा. तसेच 9224992249 वर एसएमएस करा. यासाठी RSP-स्पेस-पेट्रोल पंप डीलरचा कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com