
Petrol Diesel Prices: पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर; तुमच्या शहरातील आजची जाणून घ्या
Petrol Diesel Prices Today: सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत. रविवारीही दरात कोणताही बदल झालेला नाही. सलग २५ दिवस दरात कोणताही बदल झालेला नाही. जागतिक बाजारात कच्च्या तेलाची किंमत अजूनही १०० डॉलर प्रति बॅरलच्या वरच आहे. तेल कंपन्यांनी ६ एप्रिलला पेट्रोल आणि डिझेलच्या दरात शेवटची वाढ केली होती. तेव्हापासून देशातील चार महानगरांसह सर्व प्रमुख शहरांमध्ये तेलाच्या किमती स्थिर आहेत.
हेही वाचा: Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेलचे दर उच्चांकी पातळीवर; जाणून घ्या आजची किंमत
चारही महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर-
दिल्ली पेट्रोल 105.41 रुपये आणि डिझेल 96.67 रुपये प्रति लिटर
मुंबई पेट्रोल 120.51 रुपये आणि डिझेल 104.77 रुपये प्रति लिटर
- चेन्नई पेट्रोल 110.85 रुपये आणि डिझेल 100.94 रुपये प्रति लिटर
कोलकाता पेट्रोल 115.12 रुपये आणि डिझेल 99.83 रुपये प्रति लिटर
हेही वाचा: Petrol-Diesel Price: ग्राहकांना दिलासा! जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे आजचे दर
या राज्यांमध्ये पेट्रोलचा दर १०० रुपयांच्या पुढे-
मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, ओडिशा, जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये पेट्रोलची किंमत 100 रुपयांच्या वर आहे. मुंबईत पेट्रोलचे दर सर्वाधिक आहेत.
अशा प्रकारे घरबसल्या तेलाच्या किंमती तपासा-
या वेबसाइटवर क्लिक करा https://iocl.com/petrol-diesel-price किंवा Google च्या प्ले स्टोअरवरून IOC चे अॅप डाउनलोड करा. तसेच 9224992249 वर एसएमएस करा. यासाठी RSP-स्पेस-पेट्रोल पंप डीलरचा कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल. अशा पद्धतीने तुम्ही पेट्रोल डिझेलच्या किमती तपासू शकता
Web Title: Petrol Diesel Prices Today 2nd May 2022
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..