
अन्य शहरामध्येही पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत.
नवी दिल्ली: इंधनाच्या वाढत्या किंमती दिवसागणिक उसळी घेताना दिसत आहेत. सलग 11 व्या दिवशी दिवशी पेट्रोल- डिझेलच्या दरात (Petrol Diesel Prices) वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत पेट्रोलने नव्वदी पार केली आहे. याठिकाणी पेट्रोलच्या किंमती या 31 ते 33 पैशांनी वाढली. त्यामुळे पेट्रोलच्या किंमतीने नव्वदी पार केली. तेल वितरण कंपनी इंडियन ऑयल कॉरपोरेशनच्या माहितीनुसार, दिल्लीमध्ये शुक्रवारी 31 पैसे दर वाढ झाल्याने पेट्रोल 90.19 रुपये प्रति लिटरवर पोहचले. डिझेलच्या किंमती 33 पैशांनी वाढून 80.60 रुपये प्रति लीटर वर गेला आहे.
बिटकॉईनचा उच्चांक; किमतीने ओलांडला पन्नास हजार डॉलरचा टप्पा
अन्य शहरामध्येही पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमधील पेट्रोल दर 96 रुपये प्रति लिटरच्या पार गेला असून याठिकाणी पेट्रोल 96.62 रुपये प्रति लिटर असून डिझेल 87.67 रुपये लीटरवर पोहचले आहे. पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथील पेट्रोल दर 91.41 रुपये प्रति लीटर इतका असून डिझेल 84.19 रुपये प्रति लिटरवर पोहचले. चेन्नईतील पेट्रोलचे दर 92 रुपयेहून अधिक झाले आहेत. याठिकाणी पेट्रोल 92.25 रुपये प्रति लिटर आणि डिझेलच्या किंमती 85.63 रुपये प्रति लिटर झाले आहे. मध्य प्रदेशमधील अनूपपुर येथे गुरुवारी पेट्रोलने शंभरी पार केली होती.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
देशातील पेट्रोलवरील सर्वाधिक अधिभार हा राजस्थामध्ये आकारण्यात येतो. त्यानंतर मध्य प्रदेशचा नंबर लागतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी वाढत्या इंधनाला विरोधक कारणीभूत असल्याचा उल्लेख केला होता. यापूर्वीच्या सरकारने ऊर्जा आयातीवर योग्य काम केले असते तर आज देशातील सामान्य नागरिकांना इंधन वाढीसारख्या समस्येला सामोरे जावे लागले नसते, असे मोदींनी म्हटले होते. 2019-20 मध्ये भारताने देशांतर्गत मागणीसाठी 85 टक्के तेल आणि 53 टक्के गॅस आयात केलाय, अशी माहितीही मोदींनी दिली होती.