Pharma Stock : साडे तीन हजाराचे झाले 1 कोटी, 'या' स्टॉकने गुंतवणुकदारांना केले मालामाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pharma Stock

Pharma Stock : साडे तीन हजाराचे झाले 1 कोटी, 'या' स्टॉकने गुंतवणुकदारांना केले मालामाल

मल्टीबॅगर स्टॉक्स गुंतवणुकदारांना दमदार परतावा देत असतात. अशाच फार्मा सेक्टरमधील दिग्गज कंपनीच्या स्टॉकने केवळ 3,500 रुपयांच्या गुंतवणुकीवर गुंतवणूकदारांना कोट्यधीश बनवले. तुमचा विश्वास बसणार नाही, पण हे खरं आहे. (Pharma Stock Caplin Point Lab get best return to investors 3 thousand turned into 1 crore )

कॅपलिन पॉइंट लॅबच्या (Caplin Point Lab) शेअर्सनी गुंतवणूकदारांना असाच आश्चर्यकारक परतावा दिला आहे. 3,500 रुपयांच्या गुंतवणुकीसह गुंतवणूकदार 20 वर्षांपेक्षा कमी काळात कोट्यधीश झाले.

गेल्या काही काळापासून हे शेअर्स विक्रीच्या दबावाखाली होते पण लाँग टर्मचा विचार केल्यास त्यांनी गुंतवणुकदारांना दमदार परतावा दिला आहे. सध्या कॅपलिनचे शेअर्स 726.85 रुपयांवर ट्रेड करत आहेत.

हेही वाचा: Stock Split : 'या' केमिकल कंपनीने 3 वर्षात 1 लाखाचे केले 15 लाख

कॅपलिन पॉइंट लॅबचे शेअर्स 21 फेब्रुवारी 2003 रोजी केवळ 25 पैशांना मिळत होते. आता ते 2907 पटीने वाढून 726.85 रुपयांवर पोहोचलेत. म्हणजे त्या वेळी या कंपनीत गुंतवलेले केवळ 3500 रुपये आज 1.02 कोटी रुपये झाले असते.

या वर्षी 6 जानेवारीला हा शेअर 888.45 रुपयांच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचला. पण त्यानंतर याच विक्रीचा दबाव दिसून आला आणि 11 मे 2022 पर्यंत तो 30 टक्क्यांनी घसरून 626.30 रुपयांवर आला. यानंतर पुन्हा खरेदी झाली आणि हा शेअर 31 टक्के रिकव्हर झाला आहे.

हेही वाचा: Chemical Stocks : 3 वर्षात एक लाखाचे 21 लाख, तुमच्याकडे आहे का हा शेअर?

कॅपलिन पॉईंट ही लॅटिन अमेरिका, फ्रेंच भाषिक आफ्रिकन देशात व्यवसाय असलेली फार्मा कंपनी आहे. याशिवाय, अमेरिका आणि युरोपियन युनियनसारख्या बाजारपेठांमध्येही कॅपलिन पॉईंट ही कंपनी वेगाने पसरत आहे.

कॅपलिन पॉईंट मलम, क्रीम इत्यादी बनवते. त्यांचा व्यवसाय 1990 मध्ये सुरू झाला आणि 1994 मध्ये देशांतर्गत बाजारात ते लिस्ट झाले. त्यांचा आयपीओ 117 वेळा सबस्क्राइब झाला होता आणि आयपीओद्वारे जमा झालेले पैसे पॉंडिचेरीमध्ये प्लांट बांधण्यासाठी वापरला गेले. तेव्हापासून कंपनीने आपली उत्पादन श्रेणी आणि उत्पादन क्षमता सतत वाढवली आहे. ती आपल्या वार्षिक उत्पन्नाचा काही भाग आर अँड डीवर खर्च करते.

हेही वाचा: Share Market Opening : सेन्सेक्स 289 अंकांच्या वाढीसह 61993 वर उघडला; 'या' शेअर्समध्ये वाढ

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.