Stock Split : 'या' केमिकल कंपनीने 3 वर्षात 1 लाखाचे केले 15 लाख

आज आम्ही एका केमिकल स्टॉकबाबात सांगणार आहोत, ज्याने अगदी 3 वर्षात गुंतवणुकदारांच्या 1 लाख केलेत.
Stock Split
Stock Splitesakal

Stock Split : शेअर बाजारात असे अनेक स्टॉक्स आहेत ज्यांनी आपल्या गुंतवणुकदारांना अगदी कमी कालावधीत दमदार परतावा दिला आहे. आज आम्ही एका केमिकल स्टॉकबाबात सांगणार आहोत, ज्याने अगदी 3 वर्षात गुंतवणुकदारांच्या 1 लाख केलेत. हा केमिकल शेअर गेल्या तीन वर्षांपासून जोरदार परतावा देत आहे.

हा शेअर आहे विष्णू केमिकल्स (Vihsnu Chemicals). विशेष म्हणजे आता ही स्मॉलकॅप कंपनी आपल्या शेअरधारकांना स्टॉक स्प्लिटची भेट देणार आहे. कंपनीने स्टॉक एक्स्चेंज फाइलिंगमध्ये म्हटले आहे की, त्यांच्या संचालक मंडळाने 15 डिसेंबर 2022 रोजी झालेल्या बैठकीत 10 रुपये फेस व्हॅल्यूचा एक शेअर प्रत्येकी 2 रुपये फेस व्हॅल्यूच्या 5 शेअरमध्ये विभाजित करण्यास मान्यता दिली आहे.

Stock Split
Share Market : आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म?

स्टॉक स्प्लिटची रेकॉर्ड डेट 13 जानेवारी 2023 निश्चित करण्यात आली आहे. यासाठी भागधारकांकडून मंजुरीही मिळाली आहे.विष्णू केमिकल्स ही एक स्मॉलकॅप कंपनी असून तिचे बाजारमूल्य सुमारे 1,800 कोटी रुपये आहे. ही कंपनी केमिकल्स बनवते आणि तीन दशकांहून अधिक काळ स्टील, काच, फार्मास्युटिकल, पिगमेंट्स आणि इतर संबंधित क्षेत्रांना पुरवठा करत आहे.

Stock Split
Share Market : बाजारात पडझड, 'या' मोठ्या आयटी अन् बँकीग शेअसर्मध्ये मोठी घसरण

विष्णू केमिकल्सचा शेअर सध्या 1,565 रुपयांवर ट्रे़ड करत आहे. सोमवारी सुरुवातीच्या व्यापारात हा शेअर जवळपास 3 टक्क्यांनी वाढले. गेल्या तीन वर्षांत याने जवळपास 1,400 टक्के परतावा दिला आहे. 20 डिसेंबर 2019 रोजी, हा शेअर सुमारे 104 रुपयांवर होता. अशा प्रकारे, तीन वर्षांपूर्वी जर कोणी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील तर त्याची रक्कम 15 लाख रुपये झाली असती.

त्याच वेळी, दोन वर्षांपूर्वी हा साठा सुमारे 170 रुपयांवर होता. म्हणजेडृच गेल्या दोन वर्षात विष्णू केमिकल्सने जवळपास 800% परतावा दिला आहे. म्हणजेच, जर दोन वर्षांपूर्वी एखाद्या गुंतवणूकदाराने त्यात 1 लाख रुपये गुंतवले असते, तर त्याचे 9 लाख रुपये झाले असते. विष्णू केमिकल्सच्या शेअरने 8 सप्टेंबर 2022 रोजी 2,170 रुपयांचा उच्चांक आणि 22 डिसेंबर 2021 ला 785 रुपयांचा 52 आठवड्यांचा निचांंक गाठला आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com