esakal | मागणीत घट झाल्याने भारतात फिजीकल गोल्डवर डिस्काउंट

बोलून बातमी शोधा

Rush in Gold Market
मागणीत घट झाल्याने भारतात फिजीकल गोल्डवर डिस्काउंट
sakal_logo
By
टीम ई सकाळ

देशात कोरोनाने थैमान घातलं असून अनेक राज्यांमध्ये निर्बंध लादण्यात आले आहेत. त्याचा परिणाम बाजारपेठांवरही झाला आहे. दरम्यान, यामुळे भारतात सोने विक्रीमध्ये गेल्या आठवड्यात मोठी सूट देण्यात आली. 2021 मध्ये पहिल्यांदाच असं झालं आहे. अनेक राज्यांत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढताना दिसत आहे. लसीकरण मोहिम वेगानं सुरु असली तरीही दररोज रुग्णसंख्या उच्चांक गाठत आहे.

मुंबईतील एका डीलरने याबाबत बोलाताना अशी प्रतिक्रिया दिली की, जवळपास प्रत्येक राज्यात कोरोनामुळे निर्बंध लादण्यात आले आहेत. यामुळे सराफ दुकानेही बंद आहेत. तसंच लोकांचा प्रतिसादही अल्प आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सराफांकडून ऑफरही दिल्या जात आहेत. यामध्ये प्रति औंस 2 डॉलरपर्यंत डिस्काउंट दिला गेला. स्थानिक बाजारपेठांमधील किंमतीवर हा डिस्काउंट दिला. यामध्ये 10.75 टक्के आयात तर 3 टक्के विक्री शुल्काचाही समावेश आहे.

हेही वाचा: Gold Bonds: गोल्ड बाँडमध्ये गुंतवणुकीची या वर्षातील शेवटची संधी

सराफांनी सोनं खरेदी जवळपास बंदच केली आहे. सोन्याची मागणी पुन्हा कधी वाढेल याची कल्पना नसल्यानं खरेदीबाबत थोडे सांशक असल्याचंही डिलर्सचे म्हणणे आहे. भारतात सोन्याच्या खरेदीमध्ये लॉकडाऊनमुळे जून महिन्यात घसरण होण्याची शक्यता वर्ल्ड गोल्ड काऊन्सिलने गुरुवारी व्यक्त केली होती. चीनमध्ये सुपर लाँग विकेंडच्या आधी चांगली किंमत मिळेल असं दिसत असल्याचं स्वित्झर्लंडमधील डिलर्सचे म्हणणे आहे. चीनमध्ये लेबल डे हॉलीडे 1 ते 5 मे या कालावधीत साजरा केला जात आहे. सिंगापूरमध्ये प्रीमियम 1.6 ते 1.8 डॉलर्स वरून 1.5 ते 2.0 डॉलर्सवर पोहोचलं.

हेही वाचा: सोने पुन्हा चकाकणार..प्रतितोळा ५० हजार भाव जाणार !

सोन्याच्या मागणीमध्ये मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं आहे. गेल्या आठवड्यापेक्षा 30 टक्केंनी मागणी वाढली आहे. अस्थिर किंमतीमुळे गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या मागणीमध्ये मोठी वाढ झाल्याचं, गोल्ड सिल्व्हर सेंट्रलचे प्रमुख ब्रायन लॅन यांनी सांगितलं. हाँगकाँग आणि जपानमध्ये फिजिकल सोन्यांच्या किंमतीमध्ये मोठा बदल पाहायला मिळत आहे. कोरोना महामारीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सोन्याच्या किंमतीमध्ये मोठा फरक पाहायला मिळत असल्याचं लॅन म्हणाले.