esakal | कोरोनाच्या परिणामानंतरही अर्थव्यवस्था रुळावर येण्याचे स्पष्ट संकेत - पीयूष गोयल
sakal

बोलून बातमी शोधा

Piyush Goyal

भारताचा निर्यातीतसुद्धा वृद्धी दर चांगला असून चालू आर्थिक वर्षाच्या शेवटपर्यंत 400 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचेल असा अंदाजही पीयूष गोयल यांनी व्यक्त केला.

'कोरोनाच्या परिणामानंतरही अर्थव्यवस्था रुळावर येण्याचे स्पष्ट संकेत'

sakal_logo
By
सूरज यादव

नवी दिल्ली - वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी भारताची अर्थव्यवस्था लवकरच रुळावर येईल असा विश्वास व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटलं की, भारत चालू आर्थिक वर्षात प्रत्यक्ष परदेशी गुंतवणुक सुरुच ठेवणार आहे. कोरोनाचा परिणाम आणि जागतिक पातळीवर गुंतवणुकीचे प्रमाण कमी असूनही 2020 मध्ये भारताला सर्वाधिक एफडीआय मिळाले.

आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये देशात एफडीआयचे प्रमाण 19 टक्क्यांनी वाढून 59.63 अब्ज डॉलर इतके झाले. तसंच इक्विटी, पुनर्गुंतवणूकीतून मिळणारे उत्पन्न मिळून एकत्रीत एफडीआय गेल्या आर्थिक वर्षात 10 टक्के वाढून 81.72 अब्ज डॉलर इतके झाले. 2019-20 मध्ये ही आकडेवारी 74.39 अब्ज डॉलर होती. पीयूष गोयल यांनी सीआयआय होरासिस इंडियाने आयोजित केलेल्या एका वेबिनारमध्ये सांगितलं की, आम्हाला पूर्ण विश्वास आहे की, या वर्षीही आपण परदेशी गुंतवणुकीत सलग सातव्या वर्षी ऐतिहासिक उच्चांक गाठण्याची पंरपरा कामय ठेवू.

हेही वाचा: ‘झोमॅटो’च्या शेअरची बाजारात जोरदार ‘एंट्री’

भारताचा निर्यातीतसुद्धा वृद्धी दर चांगला असून चालू आर्थिक वर्षाच्या शेवटपर्यंत 400 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचेल असा अंदाजही पीयूष गोयल यांनी व्यक्त केला. 1 ते 21 जुलै या कालावधीत 22 अब्ज डॉलर्सची निर्यात झाली. महिन्याच्या अखेरपर्यंत ही निर्यात 32 ते 33 डॉलर्सच्या वर पोहोचेल. विकासाभिमुख सुधारणांमुळे भारताला आर्थिक परिवर्तनासाठी सक्षम केलं आहे आणि याचाच परिणाम म्हणजे भारत उत्पादन वाढवण्यात आणि मागणी पूर्ण करण्यामध्ये पुढे जात असल्याचं गोयल म्हणाले.

loading image
go to top