होळीनंतर 11 कोटी 74 लाख लोकांना मोदी सरकार देणार गिफ्ट; खात्यावर जमा होणार पैसे

pm modi
pm modi

नवी दिल्ली - केंद्र सरकार होळीनंतर देशात जवळपास 11 कोटी 74 लाख शेतकऱ्यांना आनंदाची बातमी देणार आहे. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीमध्ये नोंदणी असलेल्या सेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच पैसे जमा होणार आहेत. सरकार होळीनंतर शेतकऱ्यांना आठवा हप्ता देणार आहे. एप्रिल महिन्यात कोणत्याही तारखेला पैसे खात्यावर जमा होतील. पुढच्या काही दिवसांमध्ये तुमच्या स्टेटसमध्ये Rft Signed by State असं असेल तर तुम्हाला एप्रिलमध्ये या योजनेचा हप्ता मिळेल.

तुम्हाला योजनेतील पुढचा हप्ता मिळणार आहे की नाही हे चेक करण्यासाठी काही सोप्या स्टेप्स आहेत. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीच्या संकेतस्थळावर जा. https://pmkisan.gov.in/ यावर तुम्ही Farmers Corner पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर Beneficiary Status पर्याय निवडल्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल. त्यावर आधार क्रमांक, बँख खात्याचा नंबर आणि मोबाइल क्रमांक यापैकी एक पर्याय निवडावा लागतो. तुम्ही जो पर्याय निवडलात त्याची माहिती भरल्यानंतर Get Data वर क्लिक करा. यानंतर तुम्हाला तुमच्या व्यवहाराची पूर्ण माहिती मिळेल. यात आठव्या हप्त्याबाबतही माहिती देण्यात आलेली असेल. 

जेव्हा तुम्ही पेमेंट स्टेटस चेक करता तेव्हा अनेकदा Rft Signed by State for 1st, 2nd, 3rd, 4th, 5th, 6th किंवा 7th instalment असं दिसून येतं. याचाच अर्थ राज्य सरकारकडून तुमच्या डेटाची तपासणी केली जात आहे. आणि डेटा पूर्णपणे ठीक आहे याची खात्री झाल्यानंतरच राज्य सरकार लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे ट्रान्सफर करते. 

रजिस्ट्रेशन कसं करायचं?
https://pmkisan.gov.in/  या संकेतस्थळावर तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन पर्याय मिळेल. त्यावर क्लिक केल्यानंतर ओपन होणाऱ्या नवीन पेजवर आधार क्रमांक टाका. तिथं एक रजिस्ट्रेशन पेज ओपन होऊन त्यावर असलेल्या रजिस्ट्रेशन फॉर्ममध्ये सर्व प्रकारची माहिती भरावी लागेल. तुम्ही कोणत्या राज्यात, जिल्ह्यात, तालुक्यात, गावात राहता याची माहिती द्यावी लागेल. याशिवाय बँक खात्याची आणि आधारकार्डची माहितीसुद्धा द्यावी लागेल. ही सर्व माहिती भरल्यानंतर डिटेल्स सेव्ह करा. अर्ज सबमिट झालाय की नाही. प्रक्रिया सुरु झाली असेल किंवा नसेल तर त्याची माहिती तुम्ही 011-24300606 यावर कॉल करून घेऊ शकता.

2019 मध्ये सुरु कऱण्यात आलेल्या या योजनेमध्ये काहीवेळा गोंधळही झाला आहे. योजनेतील त्रुटी दुरुस्त करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलली आहेत. शेतकरी सन्मान निधी योजनेत नवीन रजिस्ट्रेशन करणाऱ्या शेतकऱ्यांना आता अर्ज भरण्यासाठी जमीनीचा प्लॉट नंबरसुद्दा सांगावा लागणार आहे. नव्या नियमांमुळे जुन्या लाभार्थ्यांना मिळणाऱ्या लाभावर परिणाम होणार नाही. 

पंतप्रधान किसान मानधन योजनेंतर्गत 18 ते 40 वर्ष वयोगटातील कोणत्याही शेतकऱ्याला लाभ मिळू शकतो. त्याला 60 वर्षांपर्यंत अंशत: योगदान द्यावं लागतं. हे योगदान 55 ते 200 रुपये प्रतिमहिना इतकं असतं. या योगदानानंतर 60 वर्षांवरील शेतकऱ्यांना योजनेंतर्गत 3 हजार रुपये महिन्याला किंवा 36 हजार रुपये वर्षाला पेन्शन मिळेल. ज्यांच्याकडे 2 हेक्टरपेक्षा कमी जमीन आहे त्यांना याचा फायदा घेता येतो. 

पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेणाऱ्यांना पीएम किसान मानधन योजनेसाठी कोणतीही कागदपत्रे द्यावी लागणार नाहीत. कारण या शेतकऱ्यांची कागदपत्रं भारत सरकारकडे आहेत. यासाठी शेतकऱ्यांना कॉमन सर्व्हिस सेंटरवर जाऊन रजिस्ट्रेशन करावं लागेल. रजिस्ट्रेशनसाठी आधार कार्डची झेरॉक्स घेऊन जावं लागेल. रजिस्ट्रेशनसाठी 2 फोटो आणि बँक पासबूक आवश्यक आहे. यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क द्यावे लागत नाह. तसंच रजिस्ट्रेशनवेळी शेतकऱ्यांचा किसान पेन्शन युनिक नंबर आणि पेन्शन कार्ड तयार करण्यात येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com