PM Kisan Sanman निधीचा 10वा हफ्ता अजून जमा झाला नाही, अशी करा तक्रार?

 Pradhan Mantri Kisan Sanman Nidhi Yojana
Pradhan Mantri Kisan Sanman Nidhi Yojana

PM Kisan : प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी १ जानेवारीला पीएम किसान सन्मान निधी योजनेची १० वा हप्ता जाहीर केला आहे. ज्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचा अंकाऊटमध्ये १० वा हफ्ता जमा झाला आहे. १० वा हफ्तामध्ये प्रधानमंत्रींनी १० कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या अकाऊंटमध्ये २० हजार ९०० कोटी रुपये ट्रान्सफर करत आहोत.

पीएम किसान योजनेसारख्या आर्थिक वर्षातील लाभार्थी शेतकऱ्यांना शासनाकडून 6000 हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते. प्रधाममंत्री किसान सन्मान निधीमध्ये 2000 रुपयांचे 3 हफ्ते 4 महिन्याच्या अंतराने शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होतात. जर तुमच्या अकाऊंटमध्ये पीएम किसाना निधीचा १० वा हफ्ता आला नसेल तर तुम्ही तक्रार नोंदवू शकता. चला जाणून घेऊ कशी नोंदवाल तक्रार

लिस्टमध्ये नाव नसेल कर येथे करा कॉल

जर तुमचे नाव पीएम किसान सन्मान निधीच्या 10 व्या हप्त्याच्या यादीमध्ये नसेल तर तुम्ही पीएम किसान सन्मान निधी हेल्पलाईन नंबरवर कॉल करा. हा नंबर 155261 आणि 011-24300606 आहे. येथे तुमचे म्हणणे ऐकूण घेतले जाईल आणि कमी वेळात तुमची समस्या सोडवली जाईल

पीएम किसान हेल्प डेस्क तुम्हाला संपर्क करू शकतात. तसेच सोमवार ते शुक्रवारपर्यंत पीएम-किसान हेल्प डेस्कच्या इेमलवर (Email) pmkisan-ict@gov.in वर संपर्क करू शकतात.

 Pradhan Mantri Kisan Sanman Nidhi Yojana
तुम्हाला श्रीमंत व्हायचंय, मग या गोष्टी शिकून घ्याव्याच लागतील

या कारणामुळे अटकू शकतो हफ्ता

सरकारच्या मार्फत अकाऊंटमध्ये पैसे ट्रान्सफर केले जातात. पण कधी कधी शेतकऱ्यांच्या अकाऊंटवर पैसे जमा होत नाही त्याचे कारण तुमचा आधार अकाऊंट नंबर आणि बँक अकाऊंट नंबरमध्ये चूक झाली असेल तर असे होऊ शकते त्यामुळे तुम्हाला तुमचा स्टेटस चेक करावा लागेल.

असा करा स्टेस्टस चेक

  • PM Kisan Yojna च्या अधिकृत https://pmkisan.gov.in वेबसाईटला भेट द्या.

  • त्यानंतर फार्मर कॉर्नर ऑफ्शनवर क्लिक करा

  • त्यानंतर ‘Beneficiaries List’ पर्याय ऑप्शनवर क्लिक करा.

  • आपला राज्य जिल्हा, उप जिल्हा ब्लॉक आणि गावाची निवड करा

  • आता ‘Get Report’वर क्लिक करा.

  • आता तुमच्यासमोर लिस्ट उघडेल, आता लिस्टमध्ये तुमच्या खात्याचा स्टेटस चेक करू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com