मोदींचा नवा फंडा: 'लंच पे बजेट चर्चा' 

वृत्तसंस्था
शनिवार, 10 फेब्रुवारी 2018

गेल्या निवडणुकीत मोदींनी  'चाय पे चर्चा'चा करून लोकांना त्यांच्या पक्षाचे 'व्हिजन' समजावून सांगितले होते. मोदींनी आता खासदारांना नवा 'टास्क' दिला आहे, तो म्हणजे 'लंच पे बजेट चर्चा' होय.  

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता लोकांना  केंद्रीय अर्थसंकल्प समजावून  सांगण्यासाठी  'लंच पे बजेट चर्चा' करण्याचा खासदारांना सल्ला दिला आहे. गेल्या निवडणुकीत मोदींनी  'चाय पे चर्चा'चा करून लोकांना त्यांच्या पक्षाचे 'व्हिजन' समजावून सांगितले होते. मोदींनी आता खासदारांना नवा 'टास्क' दिला आहे, तो म्हणजे 'लंच पे बजेट चर्चा' होय.  खासदारांना आपापल्या मतदारसंघात जाऊन लोकांना त्यांच्या जेवणाच्या वेळी चर्चा अर्थसंकल्पातील गोष्टी आणि तरतुदी समजावून सांगा असे सांगितले आहे. 

नुकत्याच झालेल्या भाजपच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत मोदींनी  खासदारांना  'लंच पे बजेट चर्चे'चा नवीन फंडा सांगितलं आहे. अर्थसंकल्पातील भाषा सामान्य लोकांना समजावी आणि विशेषत: ग्रामीण भागातील लोकांना आणि शेतकऱ्यांना  सरकारने त्यांच्यासाठी काय तरतुदी केल्या आहेत याबद्दल माहिती देण्यास सांगितले आहे. 

अर्थसंकल्पात शेतकरी आणि मध्यमवर्गीयांसाठी कोणत्याही चांगल्या  तरतुदी करण्यात आलेल्या नाहीत, असा प्रचार विरोधकांकडून केला जात आहे. त्यामुळे अर्थसंकल्पातील तरतुदी सामान्यांना समजावून सांगण्याचे मोदींनी खासदारांना आवाहन केले आहे.

Web Title: PM Modi Suggests "Lunch Pe Charcha" To Party Lawmakers