वाधवा पिता-पुत्र ‘ईडी’च्या कोठडीत

PMC-Bank
PMC-Bank

मुंबई - पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बॅंकेतील (पीएमसी बॅंक) गैरव्यवहाराच्या प्रकरणात एचडीआयएल कंपनीचे प्रवर्तक राकेश वाधवा आणि सारंग वाधवा या पिता-पुत्राला अटक करण्यात आली. विशेष पीएमएलए न्यायालयाने शुक्रवारी त्यांना सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) ताब्यात दिले. 

विशेष न्यायाधीश पी. राजवैद्य यांनी वाधवा पिता-पुत्राला २२ ऑक्‍टोबरपर्यंत ‘ईडी’च्या कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. पीएमसी बॅंक गैरव्यवहारातील मुख्य लाभार्थी असल्यामुळे या दोन्ही आरोपींची चौकशी करणे आवश्‍यक आहे.

त्यामुळे त्यांचा ताबा मिळावा, अशी मागणी ईडीने केली होती. या प्रकरणात सुमारे ४,३५५ कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाला असून, त्याबाबत तपास व्हायचा आहे, असे ‘ईडी’च्या वतीने कविता पाटील यांनी न्यायालयाला सांगितले. 
आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी आरोपींनी अटकेपूर्वीच पुरेशा उपाययोजना केल्या आहेत, असा दावा त्यांचे वकील अमित देसाई यांनी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com