मोदीच्या गैरव्यवहारामुळे 10 हजार नोकऱ्या धोक्यात 

वृत्तसंस्था
बुधवार, 28 फेब्रुवारी 2018

मुंबई: देशातील सार्वजनिक क्षेत्रातील मोठ्या बॅंकांपैकी एक असलेल्या पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) गैरव्यवहारामुळे 'रत्ने आणि आभूषण' या क्षेत्रात काम करणाऱ्या सुमारे 10,000 नोकऱ्या धोक्यात येण्याची शक्यता आहे. गीतांजली समूह आणि नीरव मोदी फर्मचे प्रवर्तक यांनी केलेल्या गैरव्यवहाराचा फटका आता संपूर्ण क्षेत्राला बसणार आहे. याशिवाय, रत्ने आणि आभूषण क्षेत्राला विविध बँकांकडून देण्यात आलेल्या बुडीत कर्जाच्या प्रमाणात (एनपीए) मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. 

केअर पतमानांकन संस्थेने सादर केलेल्या एका अहवालानुसार, 'रत्ने आणि आभूषण' क्षेत्राला दिलेल्या कर्जामुळे एनपीएचे प्रमाण सध्याच्या सध्याच्या 11 टक्क्यांवरून वाढून 30 टक्क्यांवर पोचण्याची शक्यता आहे. हिरे व्यापारी नीरव मोदीबरोबरच "गीतांजली'चा मालक मेहुल चोक्‍सी यांनी पीएनबीच्या मुंबईतील काही शाखांमध्ये 11 हजार 360 कोटी रुपयांचा गैरव्यवहार उघड झले आहे. आता गीतांजली जेम्स आणि नीरव मोदी फर्मने तेथील कर्मचाऱ्यांना यापुढे पगार देण्यात असमर्थ असल्याचे आणि इतर ठिकाणी नोकरी शोधा अशा आशयाचे पत्र दिले आहे. 

गीतांजली जेम्स आणि नीरव मोदी फर्म बंद पडल्याने 2018-19 मध्ये ज्वेलरीच्या परदेशी व्यापारात 5 ते 6 टक्क्यांची घसरण होणे अपेक्षित आहे. कंपनी प्रत्यक्ष काम करणारे 3000 कर्मचारी यामुळे बेरोजगार होणार आहेत. तर अप्रत्यक्षरित्या त्यावर अवलंबुन असणार्‍या 7,000-8,000 कर्मचाऱ्यांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. 

Web Title: PNB fraud may put 10,000 jobs on the line