
देशातील कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेऊन लॉकडाऊनमध्ये दिवसेंदिवस वाढ करण्यात येत आहे. परिणामी अर्थव्यवस्था मंदीच्या चक्रात अडकली आहे. सर्व उद्योग व्यवसाय ठप्प असल्याने उत्पन्न घटले आहे. अर्थव्यवस्था पूर्वपदावर येण्यासाठी आणखी काही कालावधी लागणार आहे.
'ईएमआय' स्थगितीचा कालावधी वाढण्याची शक्यता
* याआधी रिझर्व्ह बँकेचे तीन महिन्यांसाठी कर्जाच्या हप्त्यांना स्थगिती देण्याचे बँकांना निर्देश
* लॉकडाऊनचा कालावधी वाढल्याने कर्जाच्या हप्त्यांना स्थगिती देण्याच्या कालावधीत वाढ होण्याची शक्यता
* एसबीआयच्या अहवालात व्यक्त करण्यात आली शक्यता
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
मुंबई - देशातील कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेऊन लॉकडाऊनमध्ये दिवसेंदिवस वाढ करण्यात येत आहे. परिणामी अर्थव्यवस्था मंदीच्या चक्रात अडकली आहे. सर्व उद्योग व्यवसाय ठप्प असल्याने उत्पन्न घटले आहे. अर्थव्यवस्था पूर्वपदावर येण्यासाठी आणखी काही कालावधी लागणार आहे.
जिओची गुंतवणुकीची कोटीच्या कोटी उड्डाणे सुरूच
लॉकडाउनमध्ये उद्योग व्यवसाय ठप्प झाल्याने रिझर्व्ह बँकेने तीन महिन्यांसाठी कर्जाच्या हप्त्यांना स्थगिती देण्याचे बँकांना निर्देश दिले होते. मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात बँकांनी कर्जाचा हप्ता स्थगित केला होता. मात्र अजूनही लॉकडाउनमध्ये वाढ होत असल्याने बँक ग्राहकांच्या कर्जाचे हप्ते स्थगितीचा कालावधी वाढवला जाण्याची शक्यता आहे.
आणखी तीन महिने ईएमआय स्थगित होण्याची शक्यता 'एसबीआय'ने अहवालात व्यक्त केली आहे. बँकांकडून पुन्हा निर्णय घेण्यात आल्यास जून, जुलै आणि आॅगस्ट असे आणखी तीन महिने कर्जदारांना 'ईएमआय स्थगिती' मिळेल.