पोस्ट ऑफिसच्या 'या' सुपरहिट स्कीममध्ये एकदाच पैसे गुंतवा! दर महिन्याला मिळवा उत्पन्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोस्ट ऑफिसच्या 'या' सुपरहिट स्कीममध्ये एकदाच पैसे गुंतवा!

पाच वर्षानंतर तुम्हाला मासिक उत्पन्न सुरु होते.

पोस्ट ऑफिसच्या 'या' सुपरहिट स्कीममध्ये एकदाच पैसे गुंतवा!

पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम (Post Office MIS) ही एक सुपरहिट छोटी बचत योजना आहे, ज्यामध्ये तुम्हाला फक्त एकदाच गुंतवणूक (Investment) करावी लागेल. पण तुम्हाला आयुष्यभर उत्पन्न मिळेल. MIS खात्याचा मॅच्युरिटी कालावधी 5 वर्षांचा आहे. म्हणजेच पाच वर्षानंतर तुम्हाला मासिक उत्पन्न (Monthly Income) सुरु होते. या योजनेची अधिक माहिती जाणून घेऊया.

संयुक्त खात्यात (joint account) जास्तीत जास्त 9 लाखांपर्यंत गुंतवणूक

POMIS योजनेत सिंगल आणि जॉइंट दोन्ही खाते उघडता येते. किमान 1,000 रुपयांच्या गुंतवणुकीने खाते उघडता येते. तुम्ही एका खात्यात जास्तीत 4.5 लाख रुपये गुंतवू शकता. त्याच वेळी, जॉइंट अकाऊंट (Joint account) मध्ये ही लिमिट 9 लाख रुपये आहे.

हेही वाचा: पोस्ट ऑफिस, पोस्टमनच्या माध्यमातून मिळणार जनधन’चे पैसे

MIS चे फायदे

एमआयएसमध्ये दोन किंवा तीन लोक मिळूनही खातेही उघडू शकतात. या खात्यातून मिळणारे उत्पन्न प्रत्येकाला समान दिले जाते. तुम्ही केव्हाही सिंगल अकाऊंट जॉइंटमध्ये रूपांतरित करू शकता. त्याचवेळी जॉइंट अकाऊंट, सिंगल करू शकता. अकाऊंटमध्ये कोणताही बदल करण्यासाठी, सर्व खाते सदस्यांना संयुक्त अर्ज (joint application) द्यावा लागेल.

सध्याचे व्याजदर

मासिक उत्पन्न योजनेवर वार्षिक 6.6 टक्के व्याज मिळत आहे. जे दर महिन्याला दिले जाते.

हेही वाचा: आता पोस्ट ऑफिस देणार अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टला टक्कर

वेळेआधीच पॉलिसी थांबण्यासाठी नियम

MIS ची मॅच्युरिटी पाच वर्षे आहे, पण वेळेआधी तुम्ही MIS बंद करू शकता. MIS सुरू केल्यानंतर वर्ष पूर्ण झाल्यानंतरच पैसे काढू शकता. एक वर्ष ते तीन वर्षांच्या दरम्यान पैसे काढल्यास, ठेव रकमेच्या 2 टक्के परत केले जातील. तुम्ही खाते उघडल्यानंतर 3 वर्षांच्या मुदतीपूर्वी कधीही पैसे काढल्यास, तुमच्या ठेव रकमेपैकी 1 टक्के रक्कम वजा करून तुम्हाला दिली जाईल.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :post office
loading image
go to top